शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या विरोधात आणखी एक महासभा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 01:02 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी परस्पर केलेली करवाढ फेटाळल्यानंतर बहुतांशी नगरसेवकांची हौसले बुलंद झाले असून, त्यानुसार आता प्रशासनाच्या विरोधातच सभा बोलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थायी समितीच्या पाच सदस्यांनी विशेष महासभा बोलवण्यासाठी पत्र तयार केले आहे.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी परस्पर केलेली करवाढ फेटाळल्यानंतर बहुतांशी नगरसेवकांची हौसले बुलंद झाले असून, त्यानुसार आता प्रशासनाच्या विरोधातच सभा बोलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थायी समितीच्या पाच सदस्यांनी विशेष महासभा बोलवण्यासाठी पत्र तयार केले आहे. अर्थात, त्यावर निर्णय घेण्यात झालेला नाही.  महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी नगरसेवक निधीतील कामे रद्द केल्याने नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यानंतर अडीचशे कोटी रुपयांचे रस्ते आयुक्तांनीगुंडाळले. त्यातच आयुक्तांनी ई कनेक्ट यंत्रणा सक्षम केल्याने नगरसेवकांना कामेच राहिली नाहीत, असे आरोप होत असतानाच काही नगरसेवकांना भेट नाकारणे किंवा ताटकळत ठेवल्याचे आरोप होऊ लागले. याच दरम्यान, कॉँग्र्रेसच्या ज्येष्ठ  नगरसेवक डॉ. हेमलता पाटील  यांनी आपल्या प्रभागातील  कामे रद्द करण्यासंदर्भात आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर नगरसेवकांचे अधिकार या विषयावर महासभेत लक्ष्यवेधी दिली होती.  गुरुवारी (दि.१९) झालेल्या महासभेत या विषयावर चर्चा होऊ शकली नसलीतरी डॉ. पाटील यांच्या लक्षवेधीचे निमित्त करून भाजपातीलच काही ज्येष्ठ नगरसेवकांनी पुढाकार घेतला आणि स्थायी समितीतील चार सदस्यांच्या सहीने पत्र तयार केले आहे. व विशेष महासभेची मागणी केली आहे. त्यावर दिनकर पाटील, उद्धव निमसे, संतोष साळवे, पगारे यांचा समावेश आहे. करवाढी रद्दसह अन्य महासभेनेन नामंजूर केलेले ठराव आयुक्तांनी शासनाकडे पाठविल्यास त्यावेळी ही विशेष महासभा बोलविण्याची खेळी खेळली जात आहे.मुंढे यांच्या भूमिकेकडे लक्षकरवाढीचे निमित्त करून गुरुवारी झालेल्या महासभेत नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर टीकेची संधी शोधली होती. मात्र त्यावर त्याचे म्हणणे काय आहे, हे ऐकले तर नाहीच, शिवाय त्यांची बाजू मांडण्याची परवानगीदेखील नाकारण्यात आली. त्यामुळे मुंढे आता या ठरावासह केवळ त्यांनी केलेल्या ठरावाविषयी काय भूमिका घेतात व आपली बाजू कशी मांडतात याकडे महापालिका वर्तुळाचे लागून आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका