शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये पुन्हा बांधकामाच्या खड्ड्यात कोसळून मुलाचा मृत्यू; दोन दिवसांत दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 02:53 IST

दोन दिवसांत ही दुसरी घटना नाशिक शहरात घडली आहे.

 नाशिक : अंबड लिंकरोडवरील सातपूर शिवारात असलेल्या भोर टाऊनशिपजवळ मोकळ्या मैदानात तीन ते चार शाळकरी मुले खेळत होती. जवळच एका गृहप्रकल्पासाठी खोदललेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावासाचे पाणी साचलेले असून, या खड्ड्यात नऊ वर्षीय मुलगा पाय घसरून बुधवारी (दि.२) दुपारी पडला. यावेळी प्रसंगावधान दाखवत आझाद शेख या युवकाने खड्ड्यात उडी घेत बुडणाऱ्या मयूर संजय भोंडवे (रा.जाधव संकुल) या शाळकरी मुलाला बाहेर काढले. त्यास शासकिय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आपत्कालीन कक्षात रात्री पावणे अकरा वाजता त्यास मृत घोषित करण्यात आले. दोन दिवसांत ही दुसरी घटना नाशिक शहरात घडली आहे.

  विडी कामगार नगरमधील अमृतधाम येथे गृहप्रकल्पाच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तिघा मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेची पुनरावृत्ती बुधवारी (दि. २) सातपूर भागात झाली. दुपारी एक वाजेच्या दरम्यान शाळकरी मुले याठिकाणी खेळण्यासाठी आलेली असताना, मयूरचा पाय घसरला अन् तो कुठलेही संरक्षण कुंपण नसलेल्या मोठ्या खड्ड्यात कोसळला. म्हाडा कॉलनी टाऊनशिप जवळील रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत एका बांधकामासाठी हा खड्डा खोदण्यात आला आहे. जेव्हा आरडाओरड झाली व मयूरसोबत असलेल्या मुलांनी मदतीसाठी आक्रोश केला, तेव्हा जवळच असलेल्या आझाद नामक युवकाने खड्ड्याच्या दिशेने धाव घेतली. अंगावरील शर्ट काढून त्याने तत्काळ खड्ड्यात उडी घेत मयूरला बाहेर काढले. त्याच्या नाकातोंडावाटे पोटात पाणी गेले होते. त्यास जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर शासकिय जिल्हा रुग्णालयात त्याची आई सोनी भोंडवे यांनी त्यास उपचारासाठी हलविले. त्याच्यावर अतिदक्षता आपत्कालीन कक्षात उपचार सुरू होते. शासकीय रुग्णालयात अखेरपर्यंत प्रयत्न करण्यात आले मात्र त्याचा उपचाराला प्रतिसाद कमी होत गेला आणि रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू