सिन्नर : प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मºहळ परिसरातील तीन गावांतील ग्रामस्थ गाव बंद करून देवभेटीसाठी श्री क्षेत्र जेजुरी येथे शुक्रवारी (दि. ११) रवाना होत आहेत. या अनोख्या सोहळ्यासाठी पांगरीकरांनी मानाचा आकर्षक रथ बनविला असून, त्यात देव विराजमान करण्यात येणार आहे. त्यानंतर रथासह मºहळ परिसरातील हजारो ग्रामस्थ जेजुरीकडे रवाना होणार आहेत. प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाºया मºहळ येथील यात्रोत्सवात व जेजुरीच्या देवभेटी सोहळ्यात पांगरीकरांच्या रथाला विशेष मान असतो. पांगरीचा रथ गेल्याशिवाय यात्रोत्सवात किंवा जेजुरीच्या देवभेटीच्या सोहळ्याच्या धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होत नाही. जेजुरी वारीसाठी पांगरी ग्रामस्थांनी सागवानी नवीन रथ बनविला आहे. मºहळ बुद्रूक, मºहळ खुर्द व सुरेगाव येथील ग्रामस्थ आपल्या लाडक्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी सहा दिवस गाव बंद करून जेजुरीला जाणार आहेत. जेजुरीच्या खंडेरायाला या गावातील ग्रामस्थ कधी एकट्यादुकट्याने किंवा कुटुंबासमवेत जात नाही. तर सर्व ग्रामस्थ एकाचवेळी आपल्या घरांना टाळा ठोकून पालखीची देवभेट घडविण्यासाठी जेजुरीला जात असतात. गेल्या अनेक पिढ्यांपासून मºहळकरांनी कुलदैवतेच्या भेटीची आपली आगळीवेगळी परंपरा जपली आहे. यासाठी पांगरीकरांनी खास सागवानी रथ बनविला आहे. मºहळकरांना तब्बल पाच वर्षानंतर कुलदैवतेच्या दर्शनाचा योग आला आहे. यापूर्वी २००७ साली हजारो मºहळकर शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन व घरांना कुलूप लावून जेजुरीला गेले होते. त्यानंतर २०१३ व आता २०१८ साली हा योग मºहळकरांच्या वाट्याला आला आहे.पांगरीत रथाची मिरवणूकमºहळचा यात्रोत्सव असो की जेजुरीचा देवभेटीचा योग. पांगरी येथे रथाची भव्य मिरवणूक काढली जाते. गुरुवारी सायंकाळी पांगरी ग्रामस्थांनी या आकर्षक सागवानी रथाची गावातून सवाद्य मिरवणूक काढली. पुढे बैलाची जोडी व सागवानी रथात खंडेरायाची पालखी ठेवून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर रथ मºहळकडे रवाना झाला. शुक्रवारी सकाळी ९ वाजता मºहळ येथून रथ जेजुरीकडे प्रस्थान करणार आहे. पुढे रथ आणि त्यामागे मºहळकरांच्या वाहनांचा ताफा असणार आहे. शुक्रवारी रात्री श्री क्षेत्र आळंदी येथे मुक्काम होईल. रविवारी जेजुरी मुक्काम होणार आहे.
अनोखा सोहळा : मºहळकरांचे ‘जेजुरी वारी’साठी आज प्रस्थान खंडेरायाला पांगरीकरांचा मानाचा रथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:22 IST
सिन्नर : प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मºहळ परिसरातील तीन गावांतील ग्रामस्थ गाव बंद करून देवभेटीसाठी श्री क्षेत्र जेजुरी येथे शुक्रवारी (दि. ११) रवाना होत आहेत.
अनोखा सोहळा : मºहळकरांचे ‘जेजुरी वारी’साठी आज प्रस्थान खंडेरायाला पांगरीकरांचा मानाचा रथ
ठळक मुद्देरथासह मºहळ परिसरातील हजारो ग्रामस्थ जेजुरीकडे रवाना होणारआगळीवेगळी परंपरा जपली आहे