शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने ‘गोदावरी गौरव’ पुरस्कारांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 14:34 IST

१० मार्चला वितरण : सत्यशील देशपांडे, अमोल पालेकर, सुभाष अवचट यांचा समावेश

ठळक मुद्दे‘गोदावरी गौरव’ या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी शनिवारी (दि.२०) नाशकात पत्रकारपरिषदेत केली२१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे

नाशिक - येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने दर एक वर्षाआड देण्यात येणा-या ‘गोदावरी गौरव’ या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी शनिवारी (दि.२०) नाशकात पत्रकारपरिषदेत केली आहे. यावर्षी, गायक पंडित सत्यशील देशपांडे, समाजसेवक डॉ. रविंद्र आणि स्मिता कोल्हे, अभिनेता व दिग्दर्शक अमोल पालेकर, माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख, चित्रकार सुभाष अवचट आणि नुकत्याच झालेल्या कमला मिल दुर्घटनेत अडकलेल्यांना जीवदान देणारे सुदर्शन शिंदे व महेश साबळे यांना त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल कृतज्ञतेचा नमस्कार केला जाणार आहे. येत्या १० मार्चला कुसुमाग्रजांच्या स्मृतीदिनी मविप्रच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.१९९२ पासून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने विविध सहा प्रकारांमध्ये उल्लेखनिय कामगिरी बजावणा-या मान्यवरांना ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित केले जात आहे. यंदाचे पुरस्काराचे चौदावे वर्ष आहे. दर एक वर्षाआड या पुरस्काराचे वितरण होते. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावर्षी, गायन या प्रकारात गायक, संगीततज्ज्ञ, रचनाकार पंडित सत्यशील देशपांडे, लोकसेवा प्रकारात मेळघाट येथे आदिवासी जमातीत राहून सेवा बजावणारे दाम्पत्य डॉ. रविंद्र आणि स्मिता कोल्हे, नाट्य आणि चित्रपट प्रकारात मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते अमोल पालेकर, ज्ञान या प्रकारात मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, चित्र या प्रकारात चित्रकार सुभाष अवचट तसेच मुंबईत नुकत्याच घडलेल्या कमला मिल आगीच्या दुर्घटनेत सुमारे २०० लोकांचा जीव वाचविणारे पोलिस आणि गृहरक्षक दलाचे जवान सुदर्शन शिंदे व महेश साबळे यांना ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित केले जाणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार केला जाणार आहे. यापूर्वी, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणा-या जनस्थान आणि गोदावरी गौरव पुरस्कारांची घोषणा मुंबईत करण्याचा पायंडा विश्वस्तांनी पाडला होता. यंदा मात्र, तात्यासाहेबांच्या गावीच पुरस्कारांची घोषणा करण्याचे उशिराचे भान विश्वस्तांना आले. पत्रकार परिषदेप्रसंगी प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे, विश्वस्त संजय पाटील, आमदार हेमंत टकले, लोकेश शेवडे, विश्वास ठाकूर, विनायक रानडे, अरविंद ओढेकर आदी उपस्थित होते.यंदा थोरात सभागृहात वितरणकुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने जनस्थान असो अथवा गोदावरी गौरव या पुरस्कारांचे वितरण महाकवी कालिदास कलामंदिरात समारंभपूर्वक करण्यात येते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून कालिदास कलामंदिराचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने यंदा कालिदास ऐवजी मविप्र शिक्षण संस्थेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ६ वाजता वितरण सोहळा होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक