शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत गोदामाईच्या स्वच्छतेचा मनपाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 18:08 IST

नाशिक : ऐन सणासुदीच्या काळात गोदामाईचे पात्र अस्वच्छ झाल्याने अत्यंत विदारक चित्र दृष्टीस पडत आहे. यामुळे भाविक पर्यटकांमध्ये तीव्र ...

ठळक मुद्देमहापालिका प्रशासनाची उदासिनता कारणीभूत असल्याचा आरोप नदीपात्रावर शेवाळाचा हिरवा गालिचा

नाशिक : ऐन सणासुदीच्या काळात गोदामाईचे पात्र अस्वच्छ झाल्याने अत्यंत विदारक चित्र दृष्टीस पडत आहे. यामुळे भाविक पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाची उदासिनता याला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दिपावलीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेला वेग आला असताना गोदावरीच्या स्वच्छतेचा मात्र प्रशासनाला विसर पडल्याने संताप व्यक्त होत आहे.नाशिककरांची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची दुरवस्था पाचवीलाच पुजली आहे. नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यास महापालिका अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. ऐन सणासुदीच्या काळात गोदावरीचे रुपडे विदारक झाल्याने प्रदूषणाची पातळी वाढली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न होत असताना दुसरीकडे गोदावरीच्या स्वच्छता अभियानदेखील हाती घेण्याची मागणी होत आहे.

नवरात्रोत्सवापासून गोदावरीला प्रदूषणाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. नवरात्रोत्सवात सर्रासपणे निर्माल्य गोदापात्रात नागरिकांकडून टाकण्यात आले. त्याबाबत महापालिका प्रशासनाकडून कुठलेही निर्बंध घातले गेले नाही. तसेच विजयादशमीच्या दरम्यानही गोदावरीची अवस्था तशीच राहिली. त्यामुळे गोदापात्रावर तरंगणाºया निर्माल्याचे प्रमाण वाढत गेले. तसेच गोदाकाठालगत ठेवलेले निर्माल्य कलशदेखील स्वच्छ करण्याची तसदी संबंधित विभागाकडून घेतली गेली नसल्याने कलश ओसंडून वाहू लागले होते. निर्माल्याचा कचरा मोकाट जनावरांकडून विस्कटला गेला.नदीपात्रावर शेवाळाचा हिरवा गालिचातपोवन परिसरात गोदामाईच्या पात्रावर मोठ्या प्रमाणात शेवाळ साचले असून शेवाळ हटविण्याचे कार्य तातडीने हाती घेण्याची गरज आहे. अन्यथा काही दिवसांनी पाणवेलींचा विळखा अधिक घट्ट होऊन गोदामाईचा श्वास कोंडला जाण्याची शक्यता आहे. टाकळी रस्त्यालगत असलेल्या मलशुध्दीकरण केंद्रातून सांडपाण्यावर प्रक्रिया करुन नदीपात्रात सोडले जात असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला तरी हे पाणी नदीपात्रात मिसळताच नदी फेसाळते. यामुळे विषारी रासायनिक द्रव्य पाण्यात मिसळत असल्याचे स्पष्ट होते. जणू गोदापात्रात ‘विष’ मिसळत असून तीच्या तोंडाला ‘फेस’ येत असल्याचे चित्र टाकळी-तपोवन रस्त्यावरुन मार्गस्थ होताना नजरेस पडते.

टॅग्स :NashikनाशिकgodavariगोदावरीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका