शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधतेची पंढरी "अंजनेरी"ला हवे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:15 IST

गिधाडांचे प्रजनन स्थळ : कंदिलपुष्पासारख्या ३८५ वनस्पतींचे माहेरघर अझहर शेख, नाशिक : निसर्गातील जे घटक नामशेष होत चाललेत, ...

गिधाडांचे प्रजनन स्थळ : कंदिलपुष्पासारख्या ३८५ वनस्पतींचे माहेरघर

अझहर शेख,

नाशिक : निसर्गातील जे घटक नामशेष होत चाललेत, अशा वनस्पती असोत किंवा वन्यजीव, त्यांचे अंजनेरी राखीव वनाच्या कुशीत संवर्धन होताना दिसून येते. लांब चोचीचे व पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचे माहेरघर म्हणून ''अंजनेरी''चा नावलौकिक तर आहेच, मात्र दुर्मिळ ''सेरोपेजिया अंजनेरिका'' (कंदिलपुष्प)सारख्या असंख्य वनस्पती या राखीव वनक्षेत्रात आढळतात. समृद्ध जैवविविधतेचा हा नैसर्गिक वारसा अखंडितपणे संरक्षित ठेवणे काळाची गरज बनली आहे.

शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजनेरीचे नैसर्गिक आणि पर्यावरणीयदृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. या राखीव वनाच्या परिसरात अलीकडच्या काळात मानवी हस्तक्षेप वाढताना दिसून येतोय. आजुबाजूला विविध प्रकल्प उभे राहत आहेत. मानवाचे अतिक्रमण हळूहळू या वनाच्या दिशेने होऊ लागले असून यास वेळीच रोखण्याची गरज आहे. शासनाने या वनक्षेत्राला राखीव वनाचा दर्जा दिला आहे. तसेच वन विभागाने औषधी वनस्पती संवर्धन क्षेत्र म्हणून या भागाला घोषित केले आहे. अंजनेरी राखीव वनात असलेली कारवीची वाढ ही दर्जेदार झाली असून कारवीची फुले यावर्षी फुलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

---इन्फो-----

२००६ साली ''कंदिलपुष्प''चा शोध

अंजनेरीच्या पठारावर तेराशे मीटर उंचीवर मुरमाड जागेमध्ये सेरोपेजिया या वनस्पतीची नोंद शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. आर. यादव व डॉ. नीलेश मालपुरे यांनी २००६ मध्ये केली. ती सर्वात प्रथम अंजनेरीवर सापडली, म्हणून तिला ''सेरोपेजिया अंजनेरिका ''(कंदिलपुष्प) असे नाव दिले गेले.

----इन्फो---

''वाघाटी'' केवळ अंजनेरी वनात

२०२० साली नाशिकमधील अभ्यासक डॉ. संजय औटी, शरद कांबळे, कुमार विनोद, अरुण चांदोरे यांनी अंजनेरीचा भौगोलिक अभ्यास करून तेथील जैवविविधतेवर प्रकाश टाकणारा शोधनिबंध तयार केला आहे. या अभ्यासकांना अत्यंत दुर्मिळ ''वाघाटी'' ही वनस्पती आढळून आली आहे. ही वनस्पती अन्यत्र कोठेही अजून तरी मिळून आलेली नसल्याचा दावा औटी यांनी केला आहे.

-----इन्फो------

अशी आहे वन्यजीवसंपदा...

अंजनेरी वनात बिबटे, कोल्हे, मोर, तरस, खोकड, माकड, रानडुक्कर, साळींदर, मुंगुस, रानमांजर, उदमांजर, रानससे, लांडगा, भेकर, घोरपड, लांब चोचीचे गिधाड, पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचा अधिवास आढळून येतो. तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये भारतीय अजगर, हरणटोळ, घोणस, कोब्रा (नाग), मण्यार आदी सर्प आढळतात. याबरोबरच विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी हे वन नंदनवन आहे.