शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये भरणाऱ्या ज्योतिष अधिवेशनाला अंनिसचा विरोध

By संजय पाठक | Updated: May 15, 2019 16:52 IST

नाशिक -  येत्या १८ व १९ मे रोजी नाशिक शहरात होत असलेल्या राज्यस्तरीय वास्तु - ज्योतिष अधिवेशनाला महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीने कडाडून विरोध केला आहे. ज्योतिष हे शास्त्र असल्याचे सिध्द करून दाखवावे तसेच सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाबाबत यापूर्वीच दिलेले आव्हान पेलून दाखवावे असे समितीने म्हंटले आहे.

ठळक मुद्देफलज्योतिष- वास्तुशास्त्र हे थोतांड असल्याचा आरोपआधी निवडणूकीतील निकालाबाबत आव्हान स्विकारावे

नाशिक येत्या १८ व १९ मे रोजी नाशिक शहरात होत असलेल्या राज्यस्तरीय वास्तु - ज्योतिष अधिवेशनाला महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीने कडाडून विरोध केला आहे. ज्योतिष हे शास्त्र असल्याचे सिध्द करून दाखवावे तसेच सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाबाबत यापूर्वीच दिलेले आव्हान पेलून दाखवावे असे समितीने म्हंटले आहे.

नाशिकमध्ये होणाºया या वास्तु- ज्योतिष अधिवेशनाची तयारी सुरू आहे मात्र दुसरीकडे महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य सरचिटणीस ठकसेन गोराणे, राज्य सदस्य राजेंद्र फेगडे आणि जात पंचायतबाबतीतील राज्य समन्वयक कृष्णा चांदगुडे यांनी यासंदर्भात विरोध करणारे निवेदन दिले आहे. फल ज्योतिष आणि वास्तुशास्त्र निव्वळ थोतांड आहे. प्रचलीत वास्तुशास्त्र अभ्याक्रमाच्या व्यतिरीक्त लोकांच्या अज्ञानाचा, अगतिकेतचा फायदा होऊन काही धुर्त व्यक्ती आणि संस्था राजरोसपणे समाजाची आर्थिक व मानसिक लुट करतात. बिनबुडाचे ठोकताळे, मोठ्या हुशारीने हे तथाकथित वास्तु तज्ज्ञ तसेच वास्तुविशारद आणि वास्तुपंडित लोकांच्या गळी उतरवितात. प्लॉटचा आकार त्रिकोणी असेल तर घरात भांडणे सुरू होतील. अग्नेय दिशेला घराचे स्वयंपाक घर नसेल तर अन्न बेचव होईल असे भंपक दावे करून संबंधीत हेच विज्ञान असल्याचे ठसविण्याचा प्रयत्न करीत असतात.

आज विज्ञानाला महत्व अहो. निरीक्षण, प्रयोग, चिकित्सा, कार्यकारण भाव आणि पुरावा या गोष्टींना विज्ञानात महत्व असते. याच जोरावर आपण अप्रगत अवस्थेवरून मोबाईल युगापर्यंत आलो आहोत. मात्र त्याचा मागमुस वास्तुशास्त्रात आढळत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या फसव्या तंत्राच्या नादी लागून कोणीही अधिवेशन तसेच परिषदांना उपस्थित राहू नये असे आवाहन करतानाच संबंधीत व्यक्ती आणि संघटना यांनी हा विषय शास्त्र असल्याची संधी अंनिस देत आहे त्याच बरोबर सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीत कोणत्या पक्षाचे किती व कोणकोणते उमेदवार किती मताधिक्याने निवडून येतील, त्यांची टक्केवारी काय असेल, नोटा किती लोक वापरतील अशा आशयाच्या २५ प्रश्नांची प्रश्नावली अगोदरच संघटनेने जाहरि केली असन ती २० मेच्या आत संघटनेकडे पाठविण्यत यावी. प्रत्यक्ष निकालानंतर ज्योतिषांचे ठोकताळे तपासून सर्व प्रश्नांची अचुक उत्तरे देणाºयास २१ लाख रूपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यातही सहभाग नोंदविण्याचे आव्हान समितीने दिले आहे. 

टॅग्स :NashikनाशिकMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीscienceविज्ञान