सिन्नरच्या संजीवनीनगर भागात राहणारा सचिन त्र्यंबक चकोर (२३) व ढोकेनगर भागात राहणारा शिवम ऊर्फ सनी पांडुरंग गिते (१८) यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या दोघा मित्रांचा मृत्यू झाला. सचिन व सनी दोघेही चांगले मित्र होते. सचिन गेल्या काही वर्षांपासून सिन्नर व उपनगरात सर्पमित्र म्हणून मदत करीत होता. निम्म्या रात्री कोणाच्या घरात साप निघाल्यास सचिन अतिशय चपळपणे त्याला ताब्यात घेऊन जंगलात सोडून त्यास जीवदान देत होता. तर अनेक जखमी व अडकलेल्या पक्ष्यांवर उपचार करून त्यांना निसर्गाच्या मुक्त सानिध्यात तो सोडून देत होता. सचिनच्या अचानक एक्झिटने पशूपक्ष्यांसह सिन्नरकरांनी हळहळ व्यक्त केली.
शिवम ऊर्फ सनी याचा मृत्यूही मनाला चटका लावून जाणारा ठरला. शिवम कॉलेजमध्ये होता. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. शिवम आणि सचिन दोघे चांगले मित्र होते. दोघांचाही मोठा मित्र परिवार आहे. दोघा उमद्या तरुणांच्या निधनाने सिन्नरकर हळहळले आहेत.
चौकट-
स्वप्न अधुरे...
सचिन घरात एकुलता एक होता. भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने भरपूर मेहनत घेत तयारीही केली होती. अनेक ठिकाणी तो भरतीला जाऊन आला होता. सचिनला दोन विवाहित बहिणी आहेत. कुटुंबाची जबाबदारी सचिनवर होती. त्याच्या जाण्याने कुंटुबांवर दु:खाचा डाेंगर कोसळला आहे.
फोटो - २३ सचिन चकोर
सर्पमित्र सचिन चकोर
230921\23nsk_23_23092021_13.jpg
फोटो - २३ सचिन चकोर