शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचा चारा; पाण्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:25 IST

उन्हाच्या तडाख्याने पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडेनासा झाला असून, दुपारीच्या वेळी पशु-पक्षी एकांतात झाडाच्या सावलीत बसलेले दिसून येत आहेत. मार्च महिन्यापासून सूर्यनारायण सकाळपासूनच आग ओकू लागल्याने शेतकामासह मानवी जीवनावरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. उन्हाची वाढती तीव्रता  कमी होत नसल्याने शेततळी, बोअरवेल, पाझर बंधारे, केटीवेअर, विहिरींचा तळ उघडा पडू लागला आहे

वरखेडा : उन्हाच्या तडाख्याने पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडेनासा झाला असून, दुपारीच्या वेळी पशु-पक्षी एकांतात झाडाच्या सावलीत बसलेले दिसून येत आहेत. मार्च महिन्यापासून सूर्यनारायण सकाळपासूनच आग ओकू लागल्याने शेतकामासह मानवी जीवनावरही त्याचा मोठा परिणाम झालाआहे. उन्हाची वाढती तीव्रता  कमी होत नसल्याने शेततळी, बोअरवेल, पाझर बंधारे, केटीवेअर, विहिरींचा तळ उघडा पडू लागला आहे. यावर्षी पावसाळा चांगला होता यामुळे यंदा उन्हाची तीव्रता कमी जाणवेल, असे अंदाज वर्तविला जात असतानाच पारा ४१ अंशावर जाऊन पोहोचल्याने खेड्यापाड्यांतील परिसरात भीषण चाराटंचाई व पाणीटंचाईचे सावट एप्रिलमध्येच ओढवले आहे.  याशिवाय काही भागात जमिनीची पाण्याची पातळी कमी होऊनविहिरींनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच तळ गाठला आहे. यावर्षी झालेल्या पावसामुळे मुक्या जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न यावर्षी सुटेल, असे वाटत असतानाच एप्रिलमध्येच चारा व पाणीटंचाईची कमतरता जाणवत असल्याने मे महिन्यात किती भयावह परिस्थिती निर्माण होईल याची धास्ती शेतकरीवर्गाला पडू लागली आहे. खेड्यापाड्यांवरील विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केल्याने जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न गंभीर उभा राहिला आहे तर काही शेतकरी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून बोअरवेल करतानाचे चित्र दिसत आहे. पाण्याच्या शोधात पशुपक्ष्यांची भटकंती वाढली आहे.दिंडोरी : पारा ४१ अंशांवरदिंडोरी तालुक्यात तपमानाचा पारा ४१ अंशावर गेल्याने अंगाची लाही लाही होत आहे. यातच उन्हाचा तडाखा वाढल्याने घामाच्या धारांनी नागरिकांबरोबरच पशुपक्ष्यांनाही असह्य होत आहे. सध्या लग्नसराई असल्याने गावात दररोज एकतरी लग्न राहत असल्याने लग्नाची धावपळ होत आहे. पाळीव प्राणी तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव नसल्याने जनावरांना चारा विकत कसा घ्यायचा, असा प्रश्न शेतकरीवर्गाला पडला आहे. पाण्यासाठी थंडाव्यासाठी प्राणिमात्रांची धावपळ सुरू असते. पाण्याच्या ठिकाणी किंवा झाडाखाली पशुपक्षी दुपारच्या वेळी ठाण मांडत आहेत.

टॅग्स :Waterपाणी