शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
4
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
5
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
6
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
7
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
8
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
9
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
10
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
11
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
12
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
13
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
14
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
15
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
16
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
17
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
18
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
19
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...

साथरोगावर सीईओ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:53 IST

नाशिक : जिल्ह्यात उद्भवलेल्या साथरोग आजाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी अधिकाऱ्यांची हजेरी घेत त्यांना चांगलेच फैलावर घेतले. अतिसारामुळे जिल्ह्यात पाच मृत्यू झाल्याने पाण्यासारख्या संवेदनशील विषयावर बेजबादारपणे काम करणाºया अधिकाºयांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशाराही गिते यांनी दिला.

ठळक मुद्देअधिकारी फैलावर : व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा

नाशिक : जिल्ह्यात उद्भवलेल्या साथरोग आजाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी अधिकाऱ्यांची हजेरी घेत त्यांना चांगलेच फैलावर घेतले. अतिसारामुळे जिल्ह्यात पाच मृत्यू झाल्याने पाण्यासारख्या संवेदनशील विषयावर बेजबादारपणे काम करणाºया अधिकाºयांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशाराही गिते यांनी दिला.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात गुरुवारी तालुक्यातील गट विकास अधिकारी, सहायक गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, आरोग्य व ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी, गट समन्वयक, समूह समन्वयक यांची तातडीने व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली.मुख्य कार्यकारी रजेवरून आल्यानंतर त्यांनी तत्काळ अधिकाºयांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पिण्याच्या पाण्यासारख्या संवेदनशील विषयावर जबाबदारीने काम करणे आवश्यक असून, यापुढे जिल्ह्यात साथरोगाचा उद्रेक झाल्यास यासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.सुरगाणा व कळवण तालुक्यांत अतिसाराच्या साथीचा उद्रेक होऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर गिते यांनी स्वच्छ पाणीपुरवठ्याबाबत अनेकदा बैठका घेऊन आणि प्रत्यक्ष काही कारवाया करूनही कामकाजात कुचराई करण्यात आल्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला. कामकाजाबाबत अधिकाºयांमध्ये गांभीर्य नसल्याचे तसेच मुख्यालयी न राहिल्यामुळे मुख्य कार्यालयाशी त्यांचा समन्वय कमी झाल्याची बाबही गिते यांनी निदर्शनास आणून दिली.ग्रामपंचायतीमध्ये पुरेशा प्रमाणात टी.सी.एल. उपलब्ध आहे का? पाणीपुरवठा योजनेत गळती आहे का? याबाबत तपासणी करण्याचे व हातपंप तसेच विहिरी वापरात नसतील तर सदरचे स्रोत कायमचे बंद करण्याविषयी कार्यवाही करण्याचे आदेश सर्व गट विकास अधिकाºयांना देण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, राजेंद्र पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल आदी उपस्थित होते.पाणी स्रोतांची तपासणी करण्याचे आदेशसुरगाणा व कळवण तालुक्यांत घडलेल्या साथ उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांना खबरदारी घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच सर्व उपअभियंता यांनी तालुकास्तरावरील सर्व कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंता यांच्या मदतीने येत्या दोन दिवसांत प्रत्येक तालुक्यातील पाणी स्त्रोतांची तपासणी करून त्यात कोणत्या उणिवा आहेत याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. कोणत्याही पाण्याच्या स्रोतात जोखीम राहणार नाही यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश सर्व यंत्रणेला देण्यात आले.

टॅग्स :Governmentसरकारzpजिल्हा परिषद