शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
6
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
7
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
9
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
10
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
11
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
12
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
13
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
14
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
15
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
16
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
17
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
18
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
19
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
20
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप

कांदा निर्यातीवरील अनुदान बंद केल्यामुळे नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 16:18 IST

विंचूर : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर असणारे १० टक्के अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या दुसर्याच दिवशी बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर सरासरी१५० ते २०० रु पयांपर्यंत घसरले. कांद्याला थोडाफार बाजारभाव वाढत चालल्यामुळे  आनंदाचे वातावरण होते. परंतु केंद्र सरकारने निर्यातीवरील अनुदान बंद केल्यामुळे  नाराजीचे सूर दिसून येत आहेत. पीक जोमात आले की बाजारभाव पडतात आण िपिकांचे उत्पादन कमी झाले कि भाववाढीमुळे सरकार अनुदान बंद करते किंवा निर्यात बंद करतात.

ठळक मुद्दे विंचूर : पिंपळगाव, लासलगाव येथील शेतकरी पुन्हा संकटात

विंचूर : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर असणारे १० टक्के अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या दुसर्याच दिवशी बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर सरासरी१५० ते २०० रु पयांपर्यंत घसरले. कांद्याला थोडाफार बाजारभाव वाढत चालल्यामुळे  आनंदाचे वातावरण होते. परंतु केंद्र सरकारने निर्यातीवरील अनुदान बंद केल्यामुळे  नाराजीचे सूर दिसून येत आहेत. पीक जोमात आले की बाजारभाव पडतात आण िपिकांचे उत्पादन कमी झाले कि भाववाढीमुळे सरकार अनुदान बंद करते किंवा निर्यात बंद करतात. खते, औषधांचे आण िमजुरीचे भाव गगनाला भिडले आहेत. अवजारे किंवा खते औषधे त्यावर नव्यानेच लागू झालेला जीएसटी ने तर पार कंबरडेच मोडून गेले आहे.केंद्र सरकारने सहा महिन्यांपूर्वी कांदा निर्यातीवर दहा टक्के अनुदान जाहीर केले होते. अनुदान अचानक बंद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी कांद्याचे उत्पादन चांगले झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कांद्याला चांगला बाजारभाव मिळत नसल्यामुळे सरकारने निर्यातीवर अनुदान जाहीर केले. त्यामुळे भाव टिकून राहण्यास मदत झाली. गेल्या वर्षी अचानक कांद्याचे बाजारभाव वीस रु पये किलोपर्यंत गेले होते. पाकिस्तानमधुन पंजाब प्रांतात मोठ्या प्रमाणात चोरीच्या मार्गाने कांदा आल्याने बाजारभाव घसरु न पाच रु पये किलोपर्यंत आले. परिणामी व्यापारी व शेतकर्यांचे नुकसान झाले. काही शेतकर्यांचा कांदा जागेवरच सडला, काहींनी कांदा शेतात फेकून दिला. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे कांदा लावगडीत काहीशी घट झाली आहे.   कांद्याचे भाव साधारण आठ रु पये किलोपर्यंत होते. यावर्षी तरी कांद्याचे पैसे होतील. या आशेने शेतकर्यांनी कांदा साठवुन ठेवला. बाहेरील कांदा संपत आला आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत गेल्यामुळे पंधरा ते वीस दिवसात कांदा १६ ते१७ रु पये किलो पर्यंत पोहचला. दररोज वाढणार्या भावामुळे   बाजारभाव वाढत असल्याचे पाहुन बराचसा साठवलेला कांदा विक्र ीसाठी काढला नाही. अचानक झालेल्या भाववाढीमुळे केंद्र सरकारने निर्यातीवरील अनुदान बंद केल्यामुळे निर्यातीमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते. परिणामी होणार्या भाववाढीला खीळ बसू शकते.असा अंदाज विंचूर येथील कांदा खरेदीदार योगेश कदम व्यक्त केला. लोकसभा निवडणुक झाल्यानंतर एक मिहन्याच्या आत केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने शेतकर्यांनी संताप व्यक्त केला आहे. कांद्याचे थोडेफार बाजारभाव वाढु लागले होते. परंतु कांदा निर्यातीवरील अनुदान बंद झाल्याने कांद्याचे बाजारभाव वाढण्याची शक्यता मावळली आहे.