Anger against the government because of citizenship laws | नागरिकत्व कायद्यामुळे सरकारच्या विरोधात रोष
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव हरपालसिंह चुडासमा. समवेत व्यासपीठावर प्रशांत ओगले, शरद अहेर, स्वप्नील पाटील, दिनेश सोतवे, राहुल पाटील आदी.

ठळक मुद्देसत्यजित तांबे : युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत कार्यकर्त्यांना आवाहन

नाशिक : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, सरकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत विविध विकासकामे व योजना पोहोचविण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुवा म्हणून काम करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले. त्याचप्रमाणे देशात केंद्र सरकारविरोधात एनआरसी, सीएए, एनपीआरच्या मुद्द्यांवरून जनतेत रोष आहे. अशा स्थितीत समाजातील सर्व घटकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
नाशिक शहरातील काँग्रेस भवन येथे शनिवारी (दि.१८) प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव तथा राज्याचे प्रभारी हरपालसिंह चुडासमा, नाशिकचे प्रभारी प्रशांत ओगले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा युवक काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सोतवे, राहुल पाटील, उद्धव पवार, बबलू खैरे, कल्याणी रांगोळे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरातून उपस्थित युवक पदाधिकारी व कार्यकत्यांना सत्यजित तांबे यांनी ‘युवक जोडो’ अभियानाविषयी मार्गदर्शन करताना सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले. नाशिक जिल्ह्यात काँग्रेसच्या विचारधारेचे अनेक नागरिक असतानाही पक्षाची स्थिती खालावली आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी युवक काँग्रेसने नागरिकांशी संपर्क वाढवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करण्याच आवाहन करतानाच शहरातील महानगरपालिका निवडणुकांची आतापासूनच तयारी करण्याच्या दृष्टीने युवक नेत्यांची फळी उभी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या, तर हरपालसिंह चुडासमा यांनी कार्यकर्त्यांना देशातील केंद्र सरकार शेतकरीविरोधी असून, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होत नसल्याने सरकार विरोधात असंतोष आहे, असे सांगितले केले.

सीएए, एनआरसी विरोधात कॅण्डल मार्च
नाशिक जिल्हा व युवक काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सीएए, एनआरसी, सीएबी, जेएनयू हल्ला, नोटाबंदी व फसव्या आश्वासनांविरोधात काँग्रेस कमिटीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत कॅण्डल मार्च काढून सरकारचा निषेध करण्यात आला. या कॅण्डल मार्चमध्ये युवक काँग्रेससह शहर काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव हरपालसिंह चुडासमा. समवेत व्यासपीठावर प्रशांत ओगले, शरद अहेर, स्वप्नील पाटील, दिनेश सोतवे, राहुल पाटील आदी.
सत्यजित तांबे : युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत कार्यकर्त्यांना आवाहन
नागरिकत्व कायद्यामुळे सरकारच्या विरोधात रोष
नाशिक : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, सरकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत विविध विकासकामे व योजना पोहोचविण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुवा म्हणून काम करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले. त्याचप्रमाणे देशात केंद्र सरकारविरोधात एनआरसी, सीएए, एनपीआरच्या मुद्द्यांवरून जनतेत रोष आहे. अशा स्थितीत समाजातील सर्व घटकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
नाशिक शहरातील काँग्रेस भवन येथे शनिवारी (दि.१८) प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव तथा राज्याचे प्रभारी हरपालसिंह चुडासमा, नाशिकचे प्रभारी प्रशांत ओगले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा युवक काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सोतवे, राहुल पाटील, उद्धव पवार, बबलू खैरे, कल्याणी रांगोळे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरातून उपस्थित युवक पदाधिकारी व कार्यकत्यांना सत्यजित तांबे यांनी ‘युवक जोडो’ अभियानाविषयी मार्गदर्शन करताना सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले. नाशिक जिल्ह्यात काँग्रेसच्या विचारधारेचे अनेक नागरिक असतानाही पक्षाची स्थिती खालावली आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी युवक काँग्रेसने नागरिकांशी संपर्क वाढवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करण्याच आवाहन करतानाच शहरातील महानगरपालिका निवडणुकांची आतापासूनच तयारी करण्याच्या दृष्टीने युवक नेत्यांची फळी उभी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या, तर हरपालसिंह चुडासमा यांनी कार्यकर्त्यांना देशातील केंद्र सरकार शेतकरीविरोधी असून, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होत नसल्याने सरकार विरोधात असंतोष आहे, असे सांगितले केले.

सीएए, एनआरसी विरोधात कॅण्डल मार्च
नाशिक जिल्हा व युवक काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सीएए, एनआरसी, सीएबी, जेएनयू हल्ला, नोटाबंदी व फसव्या आश्वासनांविरोधात काँग्रेस कमिटीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत कॅण्डल मार्च काढून सरकारचा निषेध करण्यात आला. या कॅण्डल मार्चमध्ये युवक काँग्रेससह शहर काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

Web Title: Anger against the government because of citizenship laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.