शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अन् शाळेत लागला शूटिंगचा सेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:33 IST

येथील शासकीय कन्या शाळेत सोमवार (दि.२६) पासून नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली असून, त्यातच शाळेच्या प्रांगणात एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगचा सेटही लागला आहे. त्यामुळे मुलींना शूटिंगमुळे निर्माण होणाऱ्या गोंगाटातच परीक्षा द्यावी लागली, तर दुसरीकडे शनिवारी कोणतीही कल्पना न देता सोमवारी अचानक सुटी देऊन टाकल्याने पाचवी ते आठवीच्या मुलींचे हाल झाले.

नाशिक : येथील शासकीय कन्या शाळेत सोमवार (दि.२६) पासून नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली असून, त्यातच शाळेच्या प्रांगणात एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगचा सेटही लागला आहे. त्यामुळे मुलींना शूटिंगमुळे निर्माण होणाऱ्या गोंगाटातच परीक्षा द्यावी लागली, तर दुसरीकडे शनिवारी कोणतीही कल्पना न देता सोमवारी अचानक सुटी देऊन टाकल्याने पाचवी ते आठवीच्या मुलींचे हाल झाले.  अभ्यास बुडाला तो वेगळाच, पण अचानक सुटी मिळाल्याने आणि तोपर्यंत रिक्षा, व्हॅनवाले निघून गेल्याने बस, रिक्षांची मदत घेत विद्यार्थिनींना घरी जावे लागले. अनेक विद्यार्थिनींच्या पालकांना त्यांना घेण्यासाठी शाळेत यावे लागले.  परीक्षा काळात शूटिंगचं काय मध्येच? असे विचारणाºया पालकांना ‘नाशिकमध्ये शूटिंगच होत नाही, हे होते तर होऊ द्या की’ असे अजब उत्तर देऊन गप्प करण्यात आले. शाळेच्या आवारात जागोजागी शूटिंगचे सेट लागले असून, कलाकार, तंत्रज्ञ यांची धावपळ पहायला मिळत होती. दिवसभर शूटिंग चालले. अशाप्रकारे ऐन परीक्षेच्या हंगामात शाळा शूटिंगसाठी देणे आणि विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना न देता घरी पाठवून देणे या प्रकाराबद्दल पालकांनी  आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला.एकच दिवस आणि केवळ सकाळ सत्रासाठी शाळेचा काही भाग आपण मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी परवानगी दिली होती. या दरम्यान वर्गही सुरळीत सुरू असून, परीक्षाही शांततेत पार पडल्या आहेत. काही वर्ग सोडून देण्यात आले होते. पण अध्यापनात व्यत्यय येणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली.  - वैशाली झनकर, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :Schoolशाळाcinemaसिनेमा