शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

...अन् पैशांचा पाऊस पडलाच नाही; अघोरी विद्येचा प्रकार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:38 IST

आडगाव शिवारातील नांदूरनाक्यावर एका वाहन बाजाराच्या कार्यालयात लिंबू, मिरच्या, पांढरी साडी, हिरवे कपडे आदी वस्तू मांडून तसेच एका २१ वर्षीय कुमारिकेला देवी म्हणून बसवून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी विद्येचा प्रकार सुरू असतानाच गुरुवारी (दि. २४) मध्यरात्री पावणेबारा वाजेच्या सुमाराला आडगाव पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळाहून पूजेचे साहित्य तसेच मांत्रिकासह पाच संशयितांना अटक केली आहे.

पंचवटी : आडगाव शिवारातील नांदूरनाक्यावर एका वाहन बाजाराच्या कार्यालयात लिंबू, मिरच्या, पांढरी साडी, हिरवे कपडे आदी वस्तू मांडून तसेच एका २१ वर्षीय कुमारिकेला देवी म्हणून बसवून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी विद्येचा प्रकार सुरू असतानाच गुरुवारी (दि. २४) मध्यरात्री पावणेबारा वाजेच्या सुमाराला आडगाव पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळाहून पूजेचे साहित्य तसेच मांत्रिकासह पाच संशयितांना अटक केली आहे.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पैशांचा पाऊस पाडण्याचा डाव हाणून पाडल्याने पैशांचा पाऊस पडलाच नाही. भरवस्तीत घडलेल्या अघोरी विद्येच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील गीता गंगाधर आंबेकर या महिलेने आडगाव पोलिसांत तक्रार दिल्याने संशयितांवर जादूटोणाविरोधी कायद्या कलम २ आणि फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करून पाच संशयितांना अटक केली आहे.  आंबेकर या महिलेला पैशांची गरज असल्याने नाशिकरोड येथे राहणाऱ्या ओळखीचे प्रमोद सूर्यवंशी यांनी आंबेकर यांना सांगितले होते की, काही मांत्रिक असून, ते मंत्राच्या शक्तीने पैशांचा पाऊस पाडतात, परंतु त्यासाठी एक कुमारिका मुलगी देवी म्हणून बसवावी लागते तसेच मांत्रिक व पूजापाठ करण्यासाठी ६० हजार रुपये द्यावे लागतील ते केल्यावर मांत्रिक एक कोटी रुपयांचा पाऊस पाडेल, असे सांगितल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून होकार दिला.बुधवारी (दि. २३) आंबेकर या पुतणीसह नाशिकरोडला आल्या तेथे संशयित सूर्यवंशी याच्याशी भेट झाल्यानंतर ३० हजार रुपये दिले व बाकी काम झाल्यानंतर पैसे देण्याचे ठरले त्यानंतर सिडकोतील मांत्रिक संदीप सीताराम वाकडे (३५), देवळाली गावातील सुधीर दत्तू भोसले (३४), सिडकोतील तुषार नरेंद्र चौधरी (४०), चंद्रकांत जेजूरकर, निखिल (मांत्रिक) पूर्ण नाव माहीत नाही यांची ओळख करून दिली.  त्यानंतर संशयितांनी लिंबू, हळद, कुंकू, आंब्याची पाने, नारळ, अत्तर, विड्या, कानातील रिंग, पेढे, आदी वस्तू हिरव्या कपड्यात गुंडाळून पूजा मांडली व पुतणीला खोलीत पांढरी साडी परिधान करून दागिने परिधान करून डोळे मिटून बसण्यास सांगितले.पूजेचे साहित्य जप्तअघोरी विद्येचा प्रकार सुरू असतानाच आडगाव पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन सदाफुले, देवराम वनवे, नाजिम शेख, वैभव परदेशी, विनोद लखन, विजयकुमार सूर्यवंशी, मनोज खैरे, वैभव खांडेकर, दीपक भुसारे, राजू गांगुर्डे आदींनी घटनास्थळी जाऊन छापा मारला असता त्याठिकाणी संशयितांनी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी विद्या करून पूजा आढळून येताच पोलिसांनी मांत्रिकासह संशयितांना ताब्यात घेतले, तर एक मांत्रिक पसार झाला असून घटनास्थळाहून पोलिसांनी पूजेचे साहित्य जप्त केले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा