शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

...अन् आमदार बस घेऊनच गावात पोहोचले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 11:59 PM

बागलाण तालुक्यातील अतिदुर्गम पश्चिम पट्ट्यातील करंजखेड गावात अद्याप एसटी पोहोचली नव्हती. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना पदयात्रेशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. गावकºयांचा हा कष्टमय प्रवास थांबावा यासाठी गावकºयांनी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे कैफीयत मांडली आणि सोमवारी (दि.२०) स्वत: आमदार एसटी बस घेऊनच गावात पोहोचले. त्यावेळी करंजेड ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

ठळक मुद्देकरंजखेडला आनंदोत्सव : गावकऱ्यांनी गावात पहिल्यांदाच पाहिली एसटी

सटाणा : प्रगत म्हणवल्या जाणाºया महाराष्टÑात बागलाण तालुक्यातील अतिदुर्गम पश्चिम पट्ट्यातील करंजखेड गावात अद्याप एसटी पोहोचली नव्हती. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना पदयात्रेशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. गावकºयांचा हा कष्टमय प्रवास थांबावा यासाठी गावकºयांनी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे कैफीयत मांडली आणि सोमवारी (दि.२०) स्वत: आमदार एसटी बस घेऊनच गावात पोहोचले. त्यावेळी करंजेड ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यावेळी बोरसे यांनी परिसरातील ८० हून अधिक विद्यार्थ्यांना बस मध्ये बसवत त्यांना थेट डांगसौंदाणे येथील विद्यालयातही सोडले.करंजखेड परिसरातील दीडशेहून अधिक विद्यार्थी शालेय शिक्षण घेण्यासाठी दररोज पंधरा किलोमीटर पायपीट करून डांगसौंदाणे येथील शाळा-महाविद्यालयांमध्ये जात असल्याने या परिसरात बस सेवा सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी आमदार बोरसे यांच्याकडे केली होती. त्यांनी पंधरा दिवसांपूर्वी सटाणा बस आगाराचे आगार व्यवस्थापक उमेश बिरारी यांची भेट घेत बससेवा सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. आगार व्यवस्थापक बिरारी यांनी २० जानेवारीपासून बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासनानुसार आमदार दिलीप बोरसे सोमवारी सकाळी आठ वाजताच सटाणा बस आगारात दाखल झाले. आगार व्यवस्थापक बिरारी यांनी ठरल्याप्रमाणे सटाणा करंजखेड बसचे नियोजन केल्याने सकाळी साडेनऊ वाजता आमदार दिलीप बोरसे हे आगार व्यवस्थापकासह बसमध्ये बसत करंजखेडच्या दिशेने मार्गस्थ झाले. करंजखेड येथे पहिल्यांदाच बस दाखल झाल्याने गावकºयांनी चालक-वाहकाचे जंगी स्वागत केले. विशेष म्हणजे स्थानिक आदिवासी बांधवांनी बस देखील सजवून टाकली.गोरगरीब आदिवासी बांधवांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा असल्यातरी आजच्या आधुनिक युगात प्रवासाची साधनेदेखील महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एकविसाव्या शतकातही विद्यार्थ्यांना१५ किलोमीटर पायी प्रवास करून शिक्षणासाठी जावे लागत असेल तर ते नक्कीच दुर्दैवी आहे. अशा गंभीर समस्या सोडवणे हेच लोकप्रतिनिधींचे काम असते. - दिलीप बोरसे, आमदार

टॅग्स :Bus DriverबसचालकMLAआमदार