नाशिक : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात निलगिरीच्या झाडावर पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या करकोचा पक्ष्याची सुखरूप सुटका करण्यात यश आले. नेहमीप्रमाणे सकाळच्या वॉकला निघालेल्या मोटकरी दाम्पत्याला त्यांच्या बंगल्यासमोरील निलगिरीच्या झाडावर पतंगाच्या मांजाला पक्षी अडकलेला आढळून आला. पक्ष्याची केविलवाणी तडफड पाडून त्यांनी तत्काळ १०० नंबरवर फोन करून घटना कळवली. सिडको अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची दखल घेत तत्काळ घटनास्थळ गाठले. या पक्ष्याला कर्मचाºयांनी योजना आखत प्रयत्न करून सुखरूप खाली आणले. त्याच्या शरीरावरील जखमा पाहता उपचारासाठी त्याला पक्षीमित्राकडे सोपवण्यात आले. करकोचा पक्ष्यांची जोडी या भागात अनेक दिवसांपासून वास्तव्यास आहे. सकाळ, सायंकाळ तिचे परिसरात भ्रमण सुरू असते. जोडीतील एक पक्षी नेहमीप्रमाणे उडण्यात यशस्वी झाला तर दुसरा पक्षी मात्र झाडावरील मांज्यात अडकला.
...अन् करकोच्याला मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:02 IST
पक्ष्याला कर्मचाºयांनी योजना आखत प्रयत्न करून सुखरूप खाली आणले
...अन् करकोच्याला मिळाले जीवदान
ठळक मुद्देपक्ष्याला कर्मचाºयांनी योजना आखत प्रयत्न करून सुखरूप खाली आणले