शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

प्राचीन नाणी, नोटांचा संग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:14 IST

पावकी, एक आणे, दोन आणे अशी तांबे, पितळ, अ‍ॅल्युमिनियम आदी धातूंमधील मौर्य, यादव, मुघल, शिवकालीन काळापासून ते आतापर्यंतचे भारत व विविध देशांतील दोन हजारांहून अधिक प्राचीन नाणी, नोटा यांचा संग्रह नाशिकरोड येथील व्यावसायिक प्रभाकर बडगुजर यांनी केला आहे. मित्र, ग्राहक, भिकारी आदींच्या मदतीने बडगुजर यांनी प्राचीन नाण्यांचा मोठा खजिना जपला आहे.

ठळक मुद्देमोठा खजिना । भारतासह विविध देशांतील क्वाइन

नाशिकरोड : पावकी, एक आणे, दोन आणे अशी तांबे, पितळ, अ‍ॅल्युमिनियम आदी धातूंमधील मौर्य, यादव, मुघल, शिवकालीन काळापासून ते आतापर्यंतचे भारत व विविध देशांतील दोन हजारांहून अधिक प्राचीन नाणी, नोटा यांचा संग्रह नाशिकरोड येथील व्यावसायिक प्रभाकर बडगुजर यांनी केला आहे. मित्र, ग्राहक, भिकारी आदींच्या मदतीने बडगुजर यांनी प्राचीन नाण्यांचा मोठा खजिना जपला आहे.नाशिकरोड येथील कपड्याचे व्यावसायिक प्रभाकर बडगुजर यांनी घरी असलेली नाणी जपून ठेवत व्यवसायात आलेली दुर्मिळ नाणी साठविण्यास सुरुवात केली. नाण्याचे प्रदर्शन किंवा नाण्यासंदर्भात आलेली बातमी, माहिती संकलित करण्यासोबत बडगुजर यांनी नाणे साठविण्याचा छंद असल्याचे त्यांचा मित्र, नातेवाईक, दुकानातील ग्राहक यांना माहिती झाल्यानंतर त्यांना आपोआप दुर्मिळ नाणी भेटू लागली. भारताने कुठले नवीन नाणे चलनात आणले किंवा कोणत्या राष्टÑपुरुषाच्या जयंतीनिमित्त ठराविक नाणे तयार केले तर बडगुजर पत्रव्यवहार करून ते नाणे हमखास आपल्याकडे मिळवू लागले. बडगुजर यांनी आपल्या दुकानांत साठवलेली नाणी व्यवस्थित पॅकिंग करून काचेच्या खाली ठेवल्याने त्याबाबत गिºहाईक विचारणा करू लागले. त्यामुळे बडगुजर यांच्याकडे मौर्य, यादव, शिव, ब्रिटिश कालीन नाणी गोळा होऊ लागली.बडगुजर यांच्याकडे भारताच्या प्राचीन काळापासून तर सध्या चलनात असलेल्या नाण्याचा मोठा संग्रह आहे. अमेरिका, हॉँगकॉँग, मलेशिया, सिंगापूर, नेपाळ, जॉर्डन, इंडोनेशिया, जर्मनी, पाकिस्तान, श्रीलंका, जपान, आॅस्ट्रेलिया, बांगलादेश, अरब प्रांतातील विविध देशांचे जुने न वापरात असलेल्या नाण्याचा मोठा खजिना आहे. बडगुजर यांच्या दुकानात यापूर्वी कामाला असलेल्या रवि कुमावत हे जॉर्डन देशातील एका हॉलमध्ये कामाला होते. तेथे कुमावत यांना टीप म्हणून विविध देशांची नाणी, नोटा मिळाल्या होत्या. कुमावत जॉर्डन देश सोडून नाशिकरोडला बडगुजर यांच्या दुकानांत कामाला लागल्यानंतर त्याने टीप म्हणून मिळाले. विविध देशांचे नाणे, नोटा बडगुजरांना दिल्याने त्यांच्या खजिन्यात मोठी भर पडली. महात्मा गांधी जन्मशताब्दी, योगाला आंतरराष्टÑीय दिन घोषित केल्यानंतर त्यावर्षी काढलेली २१ योग मुद्रा (नाणी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त काढलेले १२५ रुपयांचे नाणे, राष्टÑपुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त काढलेली विशेष नाणी यांचादेखील त्यामध्ये समावेश आहे. बडगुजर आपला छंद मुलगा प्रशांत याच्या मदतीने जपत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकhistoryइतिहास