शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तीन एकर कोबीवर नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:12 IST

गारपीट, अवकाळी अशा अस्मानी, सुल्तानी संकटांनी निफाड तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून, वनसगाव येथील शेतकरी त्र्यंबक कचरू शिंदे यांनी तीन एकर क्षेत्रावरील कोबीवर नांगर फिरविला आहे.

वनसगाव : गारपीट, अवकाळी अशा अस्मानी, सुल्तानी संकटांनी निफाड तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून, वनसगाव येथील शेतकरी त्र्यंबक कचरू शिंदे यांनी तीन एकर क्षेत्रावरील कोबीवर नांगर फिरविला आहे.  शिंदे यांनी तीन एकर क्षेत्रावर कोबीची लागवड केली होती. विविध प्रकारची रासायनिक खते व जैविक घटक वापरून आपली शेती मोठ्या प्रमाणात फुलवली होती; मात्र पीक ज्यावेळी पूर्ण तयार होऊन बाजारामध्ये विकण्यासाठी नेले जाते, त्यावेळी कोबीला कुठल्याही प्रकारे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येत आहे. मजुरी व औषधांचा खर्च फिटत नसल्यामुळे संतप्त शेतकरी शिंदे यांनी कोबीवर नांगर फिरविला.कोबी बाजारात विकण्यासाठी नेली असता व्यापारी केवळ एक रु पया गड्डा अशा पद्धतीने मागणी करतात. तर कधी कधी बाजारात माल घेऊन गेल्यावर व्यापारी माल घेत नसे. कोबीच्या एका रोपाची किंमत साधारण ७० पैसे इतकी आहे. लागवडीसाठी लागणारा सुमारे पाच हजार रुपये इतका खर्च तर निंदणी, खुरपणीसह मजुरी वीस हजार इतकी होते, तर औषधाचा एक स्प्रे मारायचा तरी पाच ते सहा हजार रुपये इतका खर्च येतो. कृषी दुकानदाराकडे साधारण दोन लाख ८२ हजार इतकी उधारी झाली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या कोबीला कवडीमोल भाव मिळत असल्याने तिच्यावर नांगर फिरविण्याचा निर्णय घेतला. - त्र्यंबक शिंदे,  वनसगाव

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या