शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

निवृत्त कलाशिक्षिकेचा ज्येष्ठांसाठी ‘आनंदाश्रम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 01:09 IST

निवृत्त कलाशिक्षिकेचा ज्येष्ठांसाठी ‘आनंदाश्रम’

नाशिक : रक्ताचे नातेही जेव्हा बेईमान होते आणि आपल्या हक्काच्या घरातून बेघर व्हायची वेळ येते, अशावेळी जीवनयात्रा संपविण्यापलीकडे ज्येष्ठांपुढे दुसरा पर्याय उरत नाही. ज्येष्ठांची ही परवड थांबविण्यासाठी शहरातील सारडा कन्या विद्यामंदिरातील निवृत्त कलाशिक्षिका पूर्णिमा आठवले यांनी ‘आनंदाश्रम’ची संकल्पना मांडली असून, सदरचा प्रकल्प तडीस नेण्यासाठी त्यांची अविरत धडपड सुरू आहे. महापालिकेकडे त्यांनी जागेची मागणी केली असून उर्वरित सारा खर्च पेलण्याची तयारी दर्शविली आहे. महापालिकेतील मुखंडांना ज्येष्ठांच्या भयावह स्थितीबाबत पाझर फुटला तर ‘आनंदाश्रम’मधून अनेक ज्येष्ठांची आयुष्याची सायंकाळ सुखद बनू शकेल.सारडा कन्या विद्यामंदिरात ३२ वर्षे कलाशिक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर पूर्णिमा आठवले या २००६ मध्ये निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर त्यांनी आपल्यातील कलेचे धडे विद्यार्थ्यांना देण्याचे कर्म सुरूच ठेवले परंतु, सभोवताली ज्येष्ठ, एकाकी वृद्धांची जगण्यासाठी चाललेली लढाई पाहून त्या अस्वस्थ झाल्या. मध्यमवर्गीयांपासून उच्चभ्रूपर्यंत ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या काही केल्या कमी व्हायला तयार नाहीत. ते हक्काच्या घरात घुसमट होते आहे. तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेली मुलेही बेईमान बनत चालली आहेत. घरात वावरताना असंख्य निर्बंध येऊन पडतात. अशा साºया वातावरणात क्षणभराची विश्रांतीही नकोशी वाटायला लागते आणि त्यातूनच असंख्य वृद्ध आपला वेळ मंदिर, उद्याने, वाचनालये याठिकाणी तासन्तास घालवतात. एकाकी वृद्धांची तर मोठीच ससेहोलपट होते. अशा वृद्धांनी दिवसभर आपला वेळ ‘आनंदाश्रम’मध्ये घालवावा, त्यांचे रंजन व्हावे, मनमोकळ्या गप्पा व्हाव्यात यासाठी पूर्णिमा आठवले यांनी ध्यास घेतला आणि सदर प्रकल्प राबविण्यासाठी त्यांची वयाच्या सत्तरीतही धडपड सुरू आहे. आनंदाश्रमासाठी जागा मिळावी म्हणून महापौर, आयुक्तांसह थेट मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनाही साकडे घातले आहे. या प्रकल्पात शहरातील ज्येष्ठांनीही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. पुरेशी जागा उपलब्ध झाल्यास उर्वरित खर्च पेलण्याची तयारी त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी दर्शविली आहे. त्यांच्या प्रयत्नांना बळ मिळाल्यास, शहरातील ज्येष्ठांना हक्काचे रंजनाचे एक स्थान उपलब्ध होऊ शकेल. शहरात काही वृद्धाश्रम, आरोग्य केंद्रे आहेत. मात्र, ही यंत्रणा पुरेशी ठरत नाही. महापालिकेकडून जागा मिळावी, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. त्यातून आनंदाश्रमाची निर्मिती करता येईल आणि ज्येष्ठांसाठी दिवसभरासाठी चहा, नास्ता, जेवण, मनोरंजन व गरज पडल्यास वैद्यकीय सुविधा पुरविता येईल. अनाथ, बेघर यांनाही आधार दिला जाईल. निवृत्तीधारकांना योग्य शुल्क आकारून डे केअर सेंटर सुरू करण्याचाही मानस आहे. शहर-परिसरात अनेक ठिकाणी तळमजल्यावरील फ्लॅट्स, बंगले रिकामे आहेत. त्यांचे मालक बाहेरगावी वास्तव्यास असतात. त्यांनीही या कार्याला हातभार लावावा.  - पूर्णिमा आठवले, निवृत्त कलाशिक्षिका

टॅग्स :Teacherशिक्षक