शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् नेटिझन्स म्हणे, बिबट्या नाशिकच्या ‘गस्ती’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 22:18 IST

‘आपके शहर में तो कुत्ते घुमते होंगे, लेकिन हमारे नासिक में बिबट्या घुमता हैं...

ठळक मुद्देनाशिक बिबट्या नावाने हॅशटॅगसह ट्रेन्ड

नाशिक : नाशिककरांनी घरात बसावे, म्हणून बिबट्या रस्त्यांवर.... लॉकडाऊनच्या यशस्वीतेसाठी बिबट्याची गस्त... आता मी रस्त्यांवर तुम्ही घरात थांबा... आली लहर बिबट्याने केला कहर... रात्री २ वाजता बिबट्याने घेतली कॉफी..., नाशिककर सावधान, कोरोनासोबत बिबट्याचा धाक... अशा एक ना अनेक पोस्ट सोशलमिडियावर दिवसभर व्हायरल होत होत्या. यासोबतच अनेक नेटिझन्सकडून बिबट्याचे सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडिओदेखील शेअर केले गेले.

बिबट्याचा मुक्त संचार शनिवारपासून शहरात सुरू झाल्याच्या बातमीनंतर शहरातील नेटिझन्सचेदेखील याकडे लक्ष वेधले गेले. शुक्रवारी दिवसभर सोशलमिडियावरून सावधानतेचा ‘इशारा’ दिला जात होता; मात्र शनिवारी इंदिरानगरमधील राजसारथी सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेज आणि सुयश हॉस्पिटल, एसएसके हॉटेचल्या फुटेजने शहरात बिबट्याचा वावर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पुन्हा वाढला यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर सकाळपासून दिवसभर नेटिझन्सकडून याबाबत सोशलमिडियावर बिबट्या ‘अ‍ॅक्टिव’ ठेवण्यात आला. बिबट्याच्या संचाराबद्दल विविध अफवांनाही सुर्यास्तानंतर ऊत आल्याने वनविभागाच्या गस्तीपथकाची चांगलीच दमछाक सुरू झाली.

‘आपके शहर में तो कुत्ते घुमते होंगे, लेकिन हमारे नासिक में बिबट्या घुमता हैं... घर में रहो, इसी में अब हम सब की भलाई हैं... नाशिकच्या यंत्रणेला दोन दिवसांपासून बिबट्याची मिळतेय साथ असे विनोदही वायरल होत होते. नाशिक बिबट्या नावाने हॅशटॅगसह ट्रेन्ड सोशलमिडियावर पहावयास मिळाला.शहरात बिबट्याच्या मुक्त संचाराने एकीकडे वनविभागाची झोप उडाली असून दुसरीकडे मात्र नेटिझन्सकडून सोशलमिडियावर बिबट्याला सतत फिरविले जात आहे. सीसीटीव्हीत कैद झालेला बिबट्याच्या संचाराचे व्हिडिओ, फोटोंना सोशलमिडियावर पेव फुटल्याचे चित्र होते. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवleopardबिबट्याforest departmentवनविभागNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका