शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तोरंगण घाटात अज्ञाताचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 22:53 IST

त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या अंबोली शिवारातील तोरंगण घाटात पिकनिक पॉईंटजवळ एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या अज्ञात व्यक्तीच्या चेहऱ्यावर वार करत चेहरा विद्रुप करण्यात आला आहे. त्यामुळे या व्यक्तीचा खून करून मृतदेह घाटात फेकून दिला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत.

ठळक मुद्देखुनाचा गुन्हा दाखल : पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या अंबोली शिवारातील तोरंगण घाटात पिकनिक पॉईंटजवळ एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या अज्ञात व्यक्तीच्या चेहऱ्यावर वार करत चेहरा विद्रुप करण्यात आला आहे. त्यामुळे या व्यक्तीचा खून करून मृतदेह घाटात फेकून दिला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत.हा मृतदेह ज्याठिकाणी आढळला तो परिसर निर्जन व दाट जंगलाचा भाग आहे. शुक्रवारी (दि. ११) रात्री ९.३०च्या सुमारास हा मृतदेह आढळला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ग्रामीण) माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक सी. एस. जाधव, पोलीस नाईक एस. डी. पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.

हा मृतदेह पुरुषाचा असून, वय अंदाजे ३० ते ४०च्या दरम्यान आहे. चेहरा उभट, रंग गोरा, सडपातळ पांढऱ्या रंगाचा व त्यावर भगव्या रंगाची नक्षी असलेला फूल बाह्यांचा शर्ट, नेव्ही ब्ल्यू रंगाची मळकट पँट, पांढऱ्या रंगाची बनियन त्यावर ह्यसंजयह्ण असा मार्क असलेली चॉकलेटी रंगाची अंडरपँट, उजव्या हाताच्या कांबीवर पीए असे गोंदलेले व उजव्या पंजाच्या वरच्या भागावर ओम असे गोंदलेले आहे. या व्यक्तीच्या डोक्यावर व चेहऱ्यावर हत्याराने अनेकवेळा मारुन चेहरा विद्रुप करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला असून, याबाबतची फिर्याद त्र्यंबक पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक चंद्रभान सखाराम जाधव यांनी दिली आहे. अंबोली-तोरंगण घाटात यापूर्वीही अनेकवेळा खून करून मृतदेह फेकून देण्याच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी