शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुक्यातील शेतकऱ्याने उभारली कांदे-द्राक्षाची गुढी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 13:52 IST

मागील काही दिवसात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने द्राक्षे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

नैताळे (जि नाशिक) - निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी चक्क कांदा, लसूण व द्राक्षे यांची गुढी उभारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्षे उत्पादन घेतले जाते. मात्र मागील काही दिवसात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने द्राक्षे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याच्या वल्गना करीत असले तरी अद्याप नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आले नाही. या हंगामात कांदे मातीमोल भावात विकावे लागले होते. नैताळे येथीलच एक शेतकऱ्याने कांदा पिकावर नांगर फिरवला होता. संजय साठे हे प्रगतीशील शेतकरी असून त्यांनी बराक ओबामा यांची भेट घेऊन शेतीविषयक चर्चा केली होती. त्यांनी कांदे विकून मिळालेल्या अल्प रकमेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानिऑर्डर तर कधी टोपी उपरणे पाठवून त्यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

त्याचप्रमाणे त्यांनी लसूण, कांदा व द्राक्षे यांची गुढी उभारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे मी माझ्या शेतात पिकलेल्या द्राक्षे, कांदा व लसूण यांची गुढी उभारली आहे. अवकाळी पाऊस व गारांनी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता आजच्या नवीन वर्षापासून खंबीरपणे उभे राहून कामाला सुरुवात करावी. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत देऊन शेतमालाला चांगला भाव कसा मिळेल याकडे लक्ष द्यावे या उद्देशाने मी द्राक्षे व कांद्याची गुढी उभारून संदेश दिला आहे.संजय साठे

टॅग्स :Nashikनाशिकgudhi padwaगुढीपाडवा