शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
5
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
6
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
7
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
8
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
9
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
10
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
11
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
13
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
14
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
15
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
16
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
17
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
18
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
19
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
20
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने चालविली ॲम्ब्युलन्स; विष प्राशन केलेल्या युवकाचे वाचविले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 10:48 IST

मांजरगाव येथील २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन केले असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रात्री आठच्या सुमारास म्हाळसाकोरेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणले.

नाशिक : निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विषप्राशन केलेल्या युवकावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने आणि रात्रीच्या वेळी वाहनांची उपलब्धता नसल्याने,  त्याला तातडीने निफाडच्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचविण्यासाठी महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियांका पवार यांनी स्वतः ५ महिन्यांची गरोदर असतानाही शासकीय रुग्णवाहिका चालवत रुग्णाला  निफाडच्या रुग्णालयात  पोहोचवून त्याचे प्राण वाचविले.  

मांजरगाव येथील २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन केले असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रात्री आठच्या सुमारास म्हाळसाकोरेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणले. तिथे कार्यरत महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.पवार यांनी त्याच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले. मात्र, रुग्णाला तातडीने पुढील आधुनिक उपचारांची आवश्यकता असल्याचे त्यांच्या लक्षात आले, परंतु रुग्णवाहिका चालक रजेवर असल्याने बाका प्रसंग उद्भवला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ.पवार या स्वत: गरोदर असूनही त्याचा विचार न करता, आरोग्यसेवक संसारे यांना सोबत घेऊन रुग्णवाहिका चालवत निफाडच्या ग्रामीण रुग्णालयात तातडीने पोहोचल्या. त्यामुळेच रुग्णाचा जीव वाचल्याने त्यांच्या या धाडसी कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.   

डॉक्टरांच्या तोंडून घडलेला प्रकार   

कीटकनाशक घेतलेला रुग्ण रुग्णालयात आला. त्याला तातडीने दोन इंजेक्शन दिले. मात्र, रुग्णाचा पल्सरेट अत्यंत कमी लागत होता. अशा परिस्थितीत रुग्णाला पुढील उपचारासाठी निफाडला पोहोचविणे आवश्यक होते. त्यात आमच्या केंद्रावरचा ॲम्ब्युलन्स चालक हा रजेवर होता. अखेर मीच ॲम्ब्युलन्स चालवत त्या रुग्णाला घेऊन निफाडचे ग्रामीण रुग्णालय अवघ्या २० मिनिटांत गाठले. रुग्ण बचावल्याचा आनंद आहे. - डॉ. प्रियांका पवार, वैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :docterडॉक्टरNashikनाशिकhospitalहॉस्पिटल