शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसुती, जुळ्यांना दिला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 18:34 IST

कळवण तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील घटना

ठळक मुद्देरु ग्णवाहिकेतच सुखरूप प्रसूती करण्यात डॉ सचिन पगार व आरोग्यसेविका एस के गायकवाड यांना यश आल्याने अनर्थ टळला

कळवण : कळवण तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील तिळगव्हाण येथील मीरा सुरेश गवळी या महिलेची रु ग्णवाहिकेतच सुखरूप प्रसूती करण्यात डॉ सचिन पगार व आरोग्यसेविका एस के गायकवाड यांना यश आल्याने अनर्थ टळला. दरम्यान, सदर महिलेने जुळ्यांना जन्म दिला आहे. या घटनेने अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र तत्काळ सुरु करणे किती गरजेचे आहे ह्याची जाणीवच जिल्हा आरोग्य यंत्रणेला करुन दिलेली आहे.तालुक्यातील जयदर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या मौजे काठरा येथील उपकेंद्रात ७ आॅगस्ट रोजी मानविकास शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबारात तपासणी करण्यासाठी तिळगव्हाण येथील गरोदर आदिवासी महिला मीरा सुरेश गवळी हिस नेण्यासाठी आरोग्यसेविका एस.के. गायकवाड या गेल्या होत्या. मात्र, सदर गरोदर मातेस घरीच प्रसूती कळा सुरु झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. महिलेला आरोग्य केंद्रापर्यंत नेण्यास स्थानिक ठिकाणी कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने प्रसंगावधान राखून आरोग्यसेविका गायकवाड यांनी भ्रमणध्वनीवरून वैद्यकीय अधिकारी डॉ किशोर देशमुख यांच्याशी संपर्क साधला. डॉ देशमुख यांनी तत्काळ डॉ सचिन पगार व वैद्यकीय पथकासह रु ग्णवाहिका दहा मिनिटात घटनास्थळी रवाना केली. प्रसूती कळा सुरु असलेल्या महिलेची परिस्थिती पाहून डॉ. पगार व आरोग्यसेविका गायकवाड यांनी रु ग्णवाहिकेतच सुखरूप प्रसूती घडवून आणली. प्रसूती झाल्यानंतर जुळे बाळ असल्याचे आणि दुसरे बाळ पोटातच आडवे झाल्याचे पगार यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सदर महिलेस रु ग्णवाहिकेतून प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. त्याठिकाणी मानविकास शिबिरासाठी नाशिक येथून आलेले स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. किशोर गायकवाड व बालरोग तज्ज्ञ डॉ. अमित आव्हाड यांनी मातेची तपासणी केली आणि दुसरी प्रसुतीही सुखरूप झाली. दोन्ही बाळांचे वजन कमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रु ग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य