शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

आंबेगाव गोरखनगर : गावास पाण्यासाठी घोषणाबाजी व संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:40 IST

येवला : ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून गोरखनगर गावासाठी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी येवल्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन कार्यालयासमोर उपोषण करून आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या मागणीचे निवेदन ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे उपाध्यक्ष मोहन शेलार यांना ग्रामस्थाच्या वतीने देण्यात आले.

ठळक मुद्दे महिलांचा हंडा मोर्चा, उपोषण ग्रामस्थ व ३८ गाव योजना प्रशासनाला नाहक मनस्ताप

हंडा मोर्चात सहभागी गोरखनगर परिसरातील नागरिक.

येवला : ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून गोरखनगर गावासाठी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी येवल्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन कार्यालयासमोर उपोषण करून आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या मागणीचे निवेदन ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे उपाध्यक्ष मोहन शेलार यांना ग्रामस्थाच्या वतीने देण्यात आले.३८ गाव पाणीपुरवठा योजना प्रशासनाने गोरखनगर येथे पाणीपुरवठा करण्यासाठी २०१५ला नाहरकत प्रमाणपत्र दिले असल्याने अनकाई ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळपणा समोर आला असून, यातून गोरखनगर ग्रामस्थ व ३८ गाव योजना प्रशासनाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.अनकाई ग्रुप ग्रामपंचायत असून, यात गोरखनगरचा समावेश आहे. ७०० ते ८०० लोकसंख्या असलेले हे गाव पूर्वीपासूनच दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाते. गावात महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. येथून जवळच ३८ गाव पाणीपुरवठा योजनेची टाकी आहे. या टाकीतून गावाला पाणीपुरवठा होणे शक्य असल्याने पिण्यासाठी पाणी मिळावे, अशी मागणी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली. ग्रामपंचायत प्रशासनाने तसा प्रस्ताव ३८ गाव पाणीपुरवठा योजनेकडे दिला. २०१५ मध्ये इतर गावांसह गोरखनगरला पाणीपुरवठा करता येईल, असे पत्र प्रशासनाने ग्रामपंचायतीला दिले. २०१५ पासून ग्रामपंचायतीने या प्रश्नाकडे कानाडोळा केल्याने आज ग्रामस्थांना उपोषणाची वेळ आल्याचे निवेदनात म्हटले आहे.गोरखनगर येथे दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो; मात्र आता ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा आम्हाला उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर निवृत्ती घुमरे, बाजीराव कोल्हे, पुष्पा मेमाणे, कमल घुमरे, कविता खैरनार, भीमाबाई खैरनार आदींसह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.१३ किंवा १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी जोडून घेतले असते तर आज आमच्या गावातील लोकांवर भटकण्याची वेळ आली नसती.- जगन बोराडे,माजी सरपंच, ग्रामपंचायत अनकाईग्रामपंचायत प्रशासनाने मागणी केल्यानुसार ४ नोव्हेंबर २०१५ रोजी गोरखनगर येथे पाणीपुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली असून, पाणीपुरवठा जोडून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे.- मोहन शेलार,उपाध्यक्ष, ३८ गाव पाणीपुरवठा योजना