शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अंबानींच्या सुनेची पैठणी, सात महिने राबले कारागीर; सोने-चांदीची जर वापरून ही पैठणी साकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 11:17 IST

दिव्यांगांचे शेकडो हात त्यासाठी अहोरात्र राबत होते. पारंपरिक व नवीन डिझाइनचा संगम करून सोने-चांदीची जर वापरून ही पैठणी साकारली आहे.

सुनील गायकवाड

येवला (जि. नाशिक)  : मुकेश व नीता अंबानी यांच्या लेकाचा विवाह सोहळा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजला. या सोहळ्यात वधूने नेसलेली पैठणी येवल्यात बनवली असून, यासाठी तब्बल सात महिने लागले. दिव्यांगांचे शेकडो हात त्यासाठी अहोरात्र राबत होते. पारंपरिक व नवीन डिझाइनचा संगम करून सोने-चांदीची जर वापरून ही पैठणी साकारली आहे.

सात-आठ महिन्यांपूर्वी मनीष मल्होत्रा आणि त्यांची डिझायनरची टीम येवल्यात आली. त्यांनी डिझाइन दाखवल्या. ती टीम व कापसे उद्योग समूहाच्या संचालिका गायत्री कापसे, सुनीता खोकले व कापसे यांची डिझायनर टीम यांनी कामाला सुरुवात केली. पैठणीवरील कलाकुसर जुन्या धाटणीची असल्याने वीणकाम करण्यासाठी त्या पद्धतीचे हातमाग तयार करून घ्यावे लागले. दिव्यांग, आदिवासी विणकरांनी हे काम लीलया पेलले.

शेकडो विणकरांना  मिळाला रोजगार

अंबानी यांच्या ऑर्डर मिळाल्याने या भागामध्ये शेकडो दिव्यांगांना   काम मिळाले आहे. विणकरांना आपले कसब पणाला लावून काम करताना अनेक नवीन गोष्टी शिकता आल्या, बारकावे हेरता आले. या विवाह सोहळ्यास गायत्री कापसे उपस्थित होत्या. वधू राधिका मर्चंट यांनी गायत्री यांची भेट घेऊन या महावस्त्राचे कौतुक केले.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानी