नाशिक : शहरात स्वाइन फ्लूनंतर डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले असून अंबड परिसरातील एका युवकाचा उपचारादरम्यान डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़अंबड परिसरातील रामकृष्णनगर येथील रोहित शांतीलाल चव्हाण (२९) या युवकास डेंग्यू झाल्याने सीताबाई हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़; मात्र उपचारादरम्यान मंगळवारी (दि़ २२) साडेअकरा वाजेच्या सुमारास चव्हाण यांचा मृत्यू झाला़या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
अंबडच्या तरुणाचा डेंग्यूने मृत्यू
By admin | Updated: September 23, 2015 23:45 IST