लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतून पायी जात असलेल्या युवकास अडवून दोघा दुचाकीस्वारांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास घडली़ अभयसिंग रामानुनी चौधरी (२२, रा. कारगिल चौक, दत्तनगर) असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री नऊ वाजेच्या सुमारास कामावरून सुटल्यानंतर अभयसिंग चौधरी पायी घरी जात होता़ चुंचाळेकडून दत्तनगरकडे जात असताना पंचवटी वॉलवेल्स कंपनीच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघा संशयितांनी त्यास अडविले़ यानंतर कुठे चालला, अशी विचारणा करून शिवीगाळ केली़ यानंतर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या दुसऱ्या संशयिताने खाली उतरून धारदार शस्त्राने अभयसिंगवर वार केले़ या घटनेत अभयसिंग जखमी झाला असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अंबडला तरुणावर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: July 9, 2017 01:01 IST