शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थ्यांनी सोडविला अस्वली विद्यालयाचा पाणीप्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 17:16 IST

स्नेहमेळावा : शाळेला जलशुद्धिकरण यंत्र भेट

ठळक मुद्देवर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून मनमोकळ्या मारल्या गप्पा

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अस्वली येथील जनता विद्यालयातील सन १९९१-९२ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून तब्बल सत्तावीस वर्षांनंतर एकत्र येत स्नेहमेळावा आयोजित केला होता. याचवेळी विद्यालयाचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला पाणीप्रश्नही विद्यार्थ्यांनी सोडविला.अस्वली येथील जनता विद्यालयाच्या आनंदमेळाव्याचे औचित्य साधत माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेसाठी एक हजार लिटर क्षमता असलेल्या दोन टाक्या व एक छोटे जलशुद्धिकरण यंत्र असे साहित्य भेट स्वरु पात दिले. इतर माजी विद्यार्थ्यांनी देखील या उपक्र माचा आदर्श घ्यावा असे माजी विद्यार्थी नामदेव धोंगडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून मनमोकळ्या गप्पा मारल्या. माजी विद्यार्थिनी मनिषा गायकवाड व अनिता कासार यांनी आपल्या हाताने बनवून आणलेले पदार्थ मुख्याध्यापिक श्रीमती जगताप यांना दिले एकत्र स्नेहभोजनाचा आनंद लुटत पुन्हा एकदा एकमेकांना भेटण्याचे आश्वासन देत सर्वांनी निरोप घेतला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेसाठी कायमस्वरूपी व सर्वांच्या उपयोगी येईल अशी वस्तू शाळेला भेट दिल्यामुळे आनंद व्यक्त केला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.आर. जगताप यांनी माजी विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. याप्रसंगी विलास मुसळे, नामदेव धोंगडे, डॉ नरेंद्रसिंग, भाऊसाहेब तांबे, सुदाम धोंगडे, नंदु धोंगडे, रामभाऊ गव्हाणे, बाळू भोर, उत्तम भोर, रामनाथ गुळवे, भाऊसाहेब गुळवे, प्रकाश गुळवे, तानाजी गुळवे, शाताराम गुळवे, संतोष पवार, भाऊसाहेब मुसळे, कमलाकर दवते, उत्तम शिदे, पांडुरंग देवकर, गोकुळ गुळवे, अशोक कांडेकर, मनिषा गायकवाड, अनिता कासार, पंडित भोर आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा