शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसंख्या घटली, तरी चाचण्या सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 00:25 IST

येवला : कोरोना रुग्णसंख्या घटली असली, तरीही शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत कोरोना चाचणी आणि तपासणी मोहीम सुरूच ठेवावी, असे आदेश राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

ठळक मुद्देछगन भुजबळ : कोरोनासंदर्भात येवल्यात आढावा बैठक

येवला : कोरोना रुग्णसंख्या घटली असली, तरीही शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत कोरोना चाचणी आणि तपासणी मोहीम सुरूच ठेवावी, असे आदेश राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.रविवारी, (दि.१३) येथील शासकीय विश्रामगृहात येवला, निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व विकास कामांची आढावा बैठक पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.कोरोना रुग्णांची संख्या बर्‍याच प्रमाणात कमी झालेली आहे. मात्र, अद्यापही आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना व कोरोना तपासणी नियमित सुरू ठेवावी. रुग्णसंख्या कमी झाली, म्हणून गाफील राहू नये, अशा सूचना संबंधित अधिकार्‍यांना यावेळी भुजबळ यांनी दिल्या, तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट आहे, त्या ठिकाणी तातडीने स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसविण्याचेही त्यांनी आदेश दिले.दरम्यान, येवला शहर व तालुक्यात रखडलेल्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. बैठकीस नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, नगरपालिका गटनेते प्रवीण बनकर, येवल्याचे प्रांत अधिकारी सोपान कासार, निफाडच्या प्रांत अधिकारी डॉ.अर्चना पठारे, पालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपअभियंता उन्मेष पाटील, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.शिवसृष्टीच्या जागेची पाहणीयेवला शहरात शिवसृष्टी प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाची निविदाही काढण्यात आली असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुजबळ यांनी शिवसृष्टी जागेची पाहणी करून, या ठिकाणी करावयाच्या कामांबाबत नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. 

टॅग्स :NashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ