शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

बदल्यांच्या आधीच राडा

By admin | Updated: May 9, 2014 23:18 IST

नाशिकला सभापतींनी टाकला प्रक्रियेवर बहिष्कार

नाशिकला सभापतींनी टाकला प्रक्रियेवर बहिष्कारनाशिक : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांवरून लोकप्रतिनिधींच्या शिफारशींचा पाऊस प्रशासनावर पडत असतानाच, आता प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा नवीन संघर्षही निर्माण होऊ लागला आहे. बदल्यांपूर्वीची कर्मचार्‍यांच्या समुपदेशनाची प्रक्रिया पार पाडत असतानाच, प्रशासनाने माहिती दिली नाही म्हणून नाशिक तालुका पंचायत समितीचे सभापती अनिल ढिकले यांच्यासह पंचायत समितीच्या सदस्यांनी या प्रक्रियेवरच बहिष्कार घातल्याची घटना शुक्रवारी (दि. ९) घडली.यासंदर्भात अनिल ढिकले यांनी प्रशासनाकडे याची तक्रारही केल्याचे कळते. नाशिक तालुका पंचायत समितीअंतर्गत येणार्‍या कर्मचार्‍यांच्या समुपदेशनाची प्रक्रिया शासकीय कन्या शाळेतील गट समूह साधन केंद्राच्या इमारतीत सुरू आहे. यावेळी पंचायत समिती सभापती अनिल ढिकले, गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह पंचायत समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते. नाशिक तालुक्यातून बाहेर जाणार्‍या बदलीपात्र शिक्षक व मुख्याध्यापकांची संख्या जास्त असल्याने बदलीपात्र शिक्षकांची यादी दुपारपर्यंत तयार नसल्याचे कळते. तसेच अन्य माहितीही वेळेवर तयार नसल्याचे पाहत पारा चढलेल्या सभापती व पंचायत समिती सदस्यांनी समुपदेशन प्रक्रियेवर बहिष्कार टाकत कन्या शाळा सोडली. सायंकाळी उशिरापर्यंत गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांनी मात्र बदलीसाठी आवश्यक ती प्रक्रिया राबविण्याचे काम सुरूच ठेवल्याचे कळते. (प्रतिनिधी)माहितीच नसल्याने बहिष्कारपंचायत समितीअंतर्गत येणार्‍या बदलीपात्र कर्मचार्‍यांची माहितीच प्रशासनाकडे नसल्याने वेळेचा अपव्यय होत होता. त्यातच प्रशासनाला आवश्यक ती माहिती देता येत नसल्याने प्रक्रिया थांबविण्याशिवाय पर्यायच नसल्याने अखेरीस लोकप्रतिनिधींनी या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.- अनिल ढिकले, सभापती, पंचायत समिती, नाशिकयाद्यांमुळे अडचणपंचायत समितीअंतर्गत येणारे ४५ पैकी २६ शिक्षक व २१ पैकी १४ मुख्याध्यापक तालुक्यातून बाहेर जाणार असल्याने त्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू होते. याद्या बनविण्यास विलंब झाल्याने प्रक्रियेस थोडा विलंब झाला. मात्र प्रक्रिया सुरळीत पार पडणार आहे. सभापतींना विनंती करून प्रक्रियेसाठी बोलावण्यात येईल.- रवींद्रसिंह परदेशी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, नाशिक