शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी रविवारी मतदान साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 16:06 IST

गेल्या महिनाभरापासून गाजत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अवघे २४ तास शिल्लक राहिले असून, त्यादृष्टीने प्रशासनाने सारी तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी मालेगाव व नाशिक महापलिकेतील सर्व नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, न

ठळक मुद्देप्रशासनाची सज्जता : केंद्राचा पोलीस घेणार ताबा

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार असून, त्यासाठी प्रशासनाची तयारी पुर्ण झाली आहे. मतदानासाठी रविवारी सकाळी मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप करण्यात येणार असून, या निवडणुकीत निर्माण झालेली राजकीय चुरस पाहता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मतदान केंद्राचा ताबा पोलिसांकडे देण्यात येणार आहे.गेल्या महिनाभरापासून गाजत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अवघे २४ तास शिल्लक राहिले असून, त्यादृष्टीने प्रशासनाने सारी तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी मालेगाव व नाशिक महापलिकेतील सर्व नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगरपरिषद, नगरपंचायतीचे नगरसेवक तसेच कॅन्टोंमेंट बोर्डाचे सदस्यांना मतदानाचा हक्क असून,त्यांची संख्या जिल्ह्यात ६४४ आहे. यातील एका सदस्याच्या निधनामुळे पद रिक्त झाले आहे. या मतदारांसाठी जिल्ह्यात १५ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. त्या त्या तालुक्यातील नगरसेवकांना व सदस्यांना तालुक्याच्या तहसिल कार्यालयात मतदान केंद्र असून, नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजना कार्यालयात ही व्यवस्था असेल. या साठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षासह सहा कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी बॅलेट पेपरवर पसंतीक्रम मतदारांना नोंदवायचा असून, त्यासाठी मतदान केंद्राध्यक्षांकडे असलेला पेनचाच वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या शिवाय भ्रमणध्वनी, पेजर, कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या वस्तुंना पुर्णत: बंदी घालण्यात आली असून, प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.रविवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातून मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाºयांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यात मतपेटीसह मतपत्रिका, पेन, सील करण्याचे साहित्य, विविध प्रकारचे अर्ज अशा सुमारे ४३ प्रकारच्या वस्तुंचा समावेश असेल. या साहित्याचा वापर व त्यासाठी घ्यावयाची खबरदारीबाबत मतदान कर्मचाºयांना मार्गदर्शन करण्यात येणार असून, त्यानंतर पोलीस बंदोबस्तात साहित्य मतदान केंद्रावर रवाना करण्यात येणार आहे. सायंकाळपर्यंत मतदान केंदे तयार करण्यात येतील व मतदान कर्मचाºयांना केंद्रावरच मुक्काम करावा लागणार आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता मतदानाला प्रारंभ होईल.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक