नाशिक : येथील रामकुंड परिसरातील श्री संतसेना मंदिर येथे नाभिक महामंडळाच्या वतीने सलून व्यावसायिकांना मास्कचे वाटप स्वच्छतेबाबत जनजागृतीचा उपक्रम राष्ट्रीय नाभिक महासंघाचे अध्यक्ष भगवानराव बिडवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.यावेळी राष्ट्रीय नाभिक महासंघ, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सलून असोसिएशन, नाभिक युवा सेना, नाशिक महानगर व नाशिक जिल्हा, गंगा गोदावरी नाभिक संघाच्या आयोजित उपक्रमास राज्य पदाधिकारी नारायण यादव, अशोकराव सूर्यवंशी, सुभाषराव बिडवई, अशोकराव सोनवणे, दिलीपराव जाधव, संजय वाघ, सुरेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
सलून व्यावसायिकांना मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:13 IST