शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या जागावाटपात आकडेच घालणार खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 19:38 IST

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच युतीचे जागावाटप निश्चित झाल्याचा दावा शिवसेना करीत असून, त्यावेळी ठरल्यानुसार विधानसभेच्या फिफ्टी फिफ्टी जागा दोन्ही पक्ष लढवतील तर सत्तेतही समान वाटा सेनेला दिला जाईल, असे ठरले असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगितले जात आहे.

ठळक मुद्देसेना कमी जागा घेणार की भाजप स्वीकारणार १०-५ चा फार्म्यला?सेनेला १२० ते १२५ जागा देण्यास भाजप तयार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेत फिफ्टी फिफ्टीचा फार्म्युला लागू होणार की, सेनेला १२० जागा देत भाजपा १६० जागा लढविणार असे जागावाटपाचे वेगवेगळे आकडे जाहीर होत असताना निवडणुकीत युती झाल्यास नाशिक जिल्ह्यातही भाजप-सेनेचे जागावाटप कसे असेल, या विषयीची उत्सुकता ताणली गेली आहे. २००९ मध्ये झालेल्या युतीच्या १०-५ जागावाटप यंदा भाजप स्वीकारणार की, शिवसेना कमी जागा घेऊन भाजपला चाल देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरत असलेल्या भाजपकडून जिल्ह्यात आणखी दोन ते तीन अतिरिक्त जागांचा आग्रह धरला जात असून, त्यामुळे युतीच्या जागावाटपात आकडेच खोडा घालतील, असे दिसू लागले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच युतीचे जागावाटप निश्चित झाल्याचा दावा शिवसेना करीत असून, त्यावेळी ठरल्यानुसार विधानसभेच्या फिफ्टी फिफ्टी जागा दोन्ही पक्ष लढवतील तर सत्तेतही समान वाटा सेनेला दिला जाईल, असे ठरले असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगितले जात आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी याची माहिती सर्वप्रथम प्रसिद्धी माध्यमांना दिली त्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही त्याचा पुनरुच्चार केला आहे. प्रत्यक्षात विधानसभेसाठी भाजप सेनेला निम्म्या जागा देण्यास तयार नसल्याचे बोलले जात असून, सेनेला १२० ते १२५ जागा देण्यास भाजप तयार असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे जागावाटपावरूनच युतीची अधिकृत घोषणा होत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. राज्यपातळीवर जागावाटपात वेगवेगळे आकडे दररोज जाहीर होत असताना नाशिक जिल्ह्यातही भाजप व सेनेच्या इच्छुकांमध्ये जागा वाटपाच्या आकड्यांवरच चर्चा होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी युती तुटल्याने दोन्ही पक्षांनी पंधराही मतदारसंघांत उमेदवार उभे केले. परंतु यंदा अजून तरी युतीची चर्चा सुरू असल्याने कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील त्याविषयी उत्सुकता आहे. सन २००९ मध्ये सेना-भाजप एकत्र लढल्यावर सेनेने दहा तर भाजपने पाच जागांवर निवडणूक लढविली होती. सेनेकडून जिल्ह्याच्या जागावाटपात त्याच फार्म्युल्याचा आग्रह धरला जाण्याची शक्यता असली तरी, प्राप्त परिस्थितीत भाजपची जिल्ह्यात ताकद वाढल्याचे निमित्त करून भाजप पाच जागा घेण्यास तयार होणार काय असा प्रश्न आहे. भाजपने जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांत इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली असून, कळवण, नांदगाव, इगतपुरी मतदारसंघ पक्षाला मिळावे यासाठी इच्छुकांकडून पक्षावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे भाजप १०-५ चे सूत्र स्वीकारणार की, सेना आपल्या ताब्यातील जागा भाजपला सोडणार यावरून आकडेवारीचा खेळ मांडला जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNashikनाशिक