शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रती आरोग्य विद्यापीठ असंवेदनशील, कराड यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 18:48 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आरोग्य विद्यापीठासह सरकारही असंवेदनशील आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी पुकारलेल्या साखळी आमरण उपोषणाला पाच दिवस उलटूले असून तीन महिला आंदोलकांच्या प्रकृतीत बिघाड होऊन त्या अत्यावस्थ झालेल्या आहेत. परंतु, तरीही विद्यापीठासह प्रशासन, लोकप्रतिनिधींसह सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून विद्यापीठाकडून सातत्याने खोटी विधाने करून आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन भारतीय ट्रेड युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केला आहे.

ठळक मुद्देआरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण पाचव्या दिवशी उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावली तीन महिला कर्मचाऱ्यांवर जिल्हा रुग्णालायात उपचार

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आरोग्य विद्यापीठासह सरकारही असंवेदनशील आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी पुकारलेल्या साखळी आमरण उपोषणाला पाच दिवस उलटूले असून तीन महिला आंदोलकांच्या प्रकृतीत बिघाड होऊन त्या अत्यावस्थ झालेल्या आहेत. परंतु, तरीही विद्यापीठासह प्रशासन, लोकप्रतिनिधींसह सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून विद्यापीठाकडून सातत्याने खोटी विधाने करून आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन भारतीय ट्रेड युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कंत्राटी कामगार संघटनेने समान काम समान वेतन द्यावे, निलंबीत कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजु करून घ्यावे व निर्माण होणाऱ्या पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आदि विविध मागण्यांसाठी 1 मे पासून आमरण साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलन स्थळावरून कर्मचाऱ्यांच्या वतीने कराड यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शनिवारी (दि. 5) विद्यापीठ प्रशासनासह पालकमंत्री व राज्य सरकारला टिकेचे लक्ष केले. ते म्हणाले, कुलगपरू व कुलसचीव यांनी विद्यापीठातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची विद्यापीठाने नव्हे, तर कंत्राटदाराने नियुक्ती केल्याचा खोटा दावा केला आहे. प्रत्यक्षात विद्यापीठाच्या वकीलाने औद्योगिक न्यायालयात कर्मचाऱ्यांचा मुख्य नियोक्ता विद्यापीठच असल्याचे प्रतिज्ञापत्र केले असल्याचे डॉ. कराड यांनी यावेळी सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाच दिवस उलटून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर विद्यापीठ अथवा प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली. या दरम्यान आंदोलकांमधील, तृप्ती जाधव, ज्योती पेखळे, प्राजक्ता वणीस या महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील ज्योती पेखळे व प्राजक्ता वणीस यांची प्रकृती गंभीर असून अन्य उपोषण कर्त्यांचीही प्रकृती खालवत चालली आहे. असे असताना नाशिकचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांना वारंवार आश्वासन देऊन भेट दिली नसल्याचे कराड यांनी सांगितले. यावेळी सिटूचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर देशपांडे, राज्य कर्मचारी नेत्या सुनंदा जरांडे,शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे मुकुंद दिक्षीत, सचिन मालेगावकर, अ‍ॅड. भूषण सातले आदिंसह कामगार कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयHealthआरोग्यuniversityविद्यापीठ