नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी संपादित केलेल्या गोवर्धन शिवारातील जमिनीच्या वहिवाटदारांना विद्यापीठात स्थायी नोकरीत सामावून घेणार असल्याचे विद्यापीठाने केवळ आश्वासन दिले असून, आमची फसवणूक केल्याचा आरोप वहिवाटदारांच्या वारसांनी केला आहे. याबाबत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन केले जाणार आहे. २५ वर्षे उलटूनदेखील विद्यापीठाने एकाही वारसाला नोकरीत सामावून घेतले नसल्याने विद्यापीठ प्रशासनाचा व शासनाचा निषेध करण्यासाठी गोवर्धन ग्रामस्थांकडून येत्या १८ जुलै रोजी लाक्षणिक उपोषण व १९ जुलै रोजी धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
मुक्त विद्यापीठाने फसवणूक केल्याचा आरोप
By admin | Updated: July 18, 2014 00:38 IST