शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

'या अल्लाह भारत के दुश्मनो को नेस्तनाबूत फरमा', मशिदींमधून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 16:46 IST

"या अल्लाह हमारे मुल्क भारत की दुश्मनसे हिफाजत फरमा, दहशतगर्दी करनेवालो को नेस्तनाबूत फरमा..."

नाशिक : "या अल्लाह हमारे मुल्क भारत की दुश्मनसे हिफाजत फरमा, दहशतगर्दी करनेवालो को नेस्तनाबूत फरमा..." अशी प्रार्थना 'जुमा'च्या विशेष नमाझपठण दरम्यान धर्मगुरूंनी शहरातील विविध मशिदींमध्ये केली. उपस्थित हजारो मुस्लीम बांधवांनी त्यांच्या प्रार्थनेला सामूहिक स्वरूपात 'आमीन' म्हणत प्रतिसाद दिला. जम्मू काश्मीर च्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या  माणुसकीला काळिमा फासणाऱ्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सुन्नी मरकजी सिरत समिती व मुस्लीम समाजाकडून खतीब ए शहर हिसामुद्दीन अशरफी यांनी विशेष पत्रक जारी करून मशिदींमधून निषेध नोंदविला.नाशिकमधील सुमारे 55 ते 60 मशिदींमधून या पत्रकाचे मौलवींनी जाहीर वाचन केले. दरम्यान, दहशतवादी संघटना या कोणत्या जाती धर्माच्या नसून, माणुसकीला लागलेला कलंक आहे. कोणताही धर्म मानवतावादी विरोधी शिकवण देत नाही. इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी सदैव माणुसकीचा पुरस्कार केला आहे. ते संपूर्ण मानवजातीला शांती, सदाचार, करुणा, प्रेमाचा संदेश देऊन गेले आहे. आपल्या देशावर प्रेम व श्रद्धा हा इमानचा एक भाग असल्याचे पैगंबरानी सांगितले आहे, असे यावेळी धर्मगुरूंनी आपल्या प्रवचनातून सांगितले. आज बहुतांश मशिदींमधून मौलवींनी जुमाच्या विशेष प्रवचनातून इस्लाम अन् देशप्रेम या विषयावर प्रकाश टाकला. सामूहिक प्रार्थना करताना या भ्याड हल्ल्याचा मशिदींमधून निषेध नोंदविला गेला. तसेच बडी दर्गा मैदानावर, जुने नाशिक भागातील हेलबावडी मशिदीबाहेर मुस्लीम बांधवांनी हातात तिरंगा घेत भारताचा जयजयकार करत, पाकिस्तान व दहशतवाद मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादPakistanपाकिस्तान