शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

आयुक्तांविरोधात एकवटल्या सर्व कामगार संघटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:32 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनात शिस्त आणण्याचा प्रयत्न चालविला असतानाच आयुक्तांकडून एकापाठोपाठ अधिकारी-कर्मचारी निलंबनाची कारवाई सुरू असल्याने त्या विरोधात महापालिकेतील सर्व कामगार संघटना एकवटल्या आहेत. सोमवारी (दि.२) पंडित कॉलनीतील लायन्स क्लबच्या सभागृहात आयोजित बैठकीत आयुक्तांनी चालविलेल्या कारवायांचा निषेध करत कृती समिती स्थापन करून त्याद्वारे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनात शिस्त आणण्याचा प्रयत्न चालविला असतानाच आयुक्तांकडून एकापाठोपाठ अधिकारी-कर्मचारी निलंबनाची कारवाई सुरू असल्याने त्या विरोधात महापालिकेतील सर्व कामगार संघटना एकवटल्या आहेत. सोमवारी (दि.२) पंडित कॉलनीतील लायन्स क्लबच्या सभागृहात आयोजित बैठकीत आयुक्तांनी चालविलेल्या कारवायांचा निषेध करत कृती समिती स्थापन करून त्याद्वारे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.  आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक निर्णय घेत प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, आयुक्तांकडून कोणतीही शहानिशा न करता अधिकारी व कर्मचारी यांना थेट निलंबनाची कारवाई केली जात असल्याने कामगार-कर्मचारी तसेच अधिकारी वर्गात अस्वस्थता वाढली आहे. त्यासाठीच सोमवारी सर्व कर्मचारी-कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल नापसंती व्यक्त करत टीका करण्यात आली. आयुक्तांची काम करून घेण्याची पद्धत हुकूमशहासारखी असल्याचा आरोप करण्यात आला. कायद्याचा धाक दाखवून निलंबन, बडतर्फीची कारवाई करण्यात येत असल्याबद्दल निषेध करण्यात आला. रात्रीची साफसफाई बंद करण्यात येऊ नये, चुकीच्या पद्धतीने कर्मचारी, कामगारांचे करण्यात आलेले निलंबन मागे घ्यावे, रिक्त पदांची भरती करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. सफाई कर्मचारी काम करत नसल्याचे चित्र निर्माण केले जात असल्याने सफाई कर्मचारी हा घटक बदनाम होत असल्याचा आरोप मेघवाळ, वाल्मीकी संघटनेचे सुरेश मारू यांनी केला. आयुक्तांकडून संघटनांच्या पदाधिकाºयांना तुच्छतेची वागणूक मिळत असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. यावेळी म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे, मेघवाळ वाल्मीकी संघटनेचे सुरेश दलोड, मागासवर्गीय संघटनेचे नेते माजी महापौर अशोक दिवे, रिपब्लिकन फेडरेशनचे संतोष वाघ, सेवास्तंभचे प्रकाश अहिरे, अखिल भारतीय श्री वाल्मीकी नवयुवक संघाचे अनिल बहोत, तसेच ताराचंद पवार, रमेश मकवाना, विजय बेहनवाल आदी उपस्थित होते.आज पुन्हा बैठकसर्व कामगार संघटनांनी आयुक्तांच्या भूमिकेविरुद्ध लढा पुकारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, मंगळवारी (दि.३) दुपारी १२ वाजता महापालिका कर्मचारी, कामगार सेनेच्या कार्यालयात सर्व संघटना प्रतिनिधींची बैठक होणार असून, त्यात सर्व नेत्यांची कृती समिती स्थापन करून पुढील दिशा ठरविली जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे