शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांत होणार सर्व प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 15:33 IST

प्रस्ताव मंजूर : पीपीपी तत्वावर चालविणार प्रयोगशाळा

ठळक मुद्दे रुग्णालयांमध्ये पॅथॉलॉजी लॅबमध्ये पॅथोलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या रक्ताच्या चाचण्या बाहेरील खासगी लॅबमधून करून घ्यावा लागतातमहापालिकेच्या कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ७५० स्क्वे. फूट जागेत सुसज्ज लॅब उभारण्याच्या प्रस्तावास मंजुरी

नाशिक - महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पॅथॉलॉजी लॅबमध्ये पॅथोलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या रक्ताच्या चाचण्या बाहेरील खासगी लॅबमधून करून घ्यावा लागतात. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक झळ सोसावी लागते. आता, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रक्ताच्या सर्व प्रकारच्या चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध होणार असून पीपीपी तत्वावर प्रयोगशाळा उभारून मनपाने चाचण्यांसाठी ठरवून दिलेले दर आकारले जाणार आहेत. महापालिकेच्या कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ७५० स्क्वे. फूट जागेत सुसज्ज लॅब उभारण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने सोमवारी (दि.२२) मंजुरी दिली.महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय, पंचवटीतील इंदिरागांधी रुग्णालय, कथड्यातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि सिडकोतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात कार्यरत पॅथॉलॉजी लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने रुग्णांना रक्ताच्या अनेक चाचण्या बाहेरील खासगी लॅबमधून करुन घ्याव्या लागतात. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. त्यासाठी वैद्यकीय विभागाने मनपाच्या रुग्णालयातील प्रयोगशाळांमध्ये दैनंदिन होणा-या रक्ताच्या चाचण्या वगळून इतर आवश्यक त्या रक्ताच्या सर्व प्रकारच्या चाचण्या पीपीपी तत्वावर करून घेण्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवला होता. या प्रस्तावानुसार, महापालिकेने संबंधित एजन्सीस प्रयोगशाळेसाठी आवश्यक तेवढी जागा दवाखान्यात उपलब्ध करुन द्यावी आणि अन्य दवाखान्यांमध्ये रक्ताचे नमुने घेण्यासाठी टेबल उपलब्ध करुन द्यावे. सदर जागेत एजन्सीने प्रयोगशाळा उभारुन ज्या चाचण्या मनपा रुग्णालयात होत नाहीत त्या मनपाच्या वैद्यकीय विभागाने निश्चित करून दिलेल्या दरामध्ये करुन द्याव्यात आणि एजन्सीने मनपाला जागेचे भाडे अदा करावे. त्यानुसार, महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली आणि त्यासंबंधीचा प्रस्ताव सोमवारी(दि.२२) स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवला होता. स्थायीने प्रस्तावाला मंजुरी दिल्याने आता मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्रयोगशाळा उभारली जाणार असून रक्ताच्या सर्व प्रकारच्या ३२१ चाचण्या करणे सुलभ होणार आहे. त्यासाठी बाहेरील खासगी लॅबमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. मनपा रुग्णालयांतील रुग्णांचे रक्तनमुने घेऊन याठिकाणी चाचण्या केल्या जाणार आहेत व तसा अहवाल त्या-त्या रुग्णालयांमध्ये पाठविला जाणार आहे.मनपाला मिळणार उत्पन्नमहापालिकेकडून सदर काम हे मिलेनियम स्पेशल लॅब प्रा. लिमिटेड या संस्थेला देण्यात आले असून त्यांना प्रयोगशाळेसाठी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ७५० स्क्वे. फूट जागा दहा वर्षांसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सदर जागेपोटी महापालिकेला दरवर्षी जीएसटीसह १९ लाख ९७ हजार ६२२ रुपये भाडे मिळणार आहे. याचबरोबर, रक्ताच्या चाचण्यांचे दर वैद्यकीय विभाग निश्चित करून देणार असून या दरामध्ये दर दोन वर्षांनी १० टक्के वाढ केली जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका