शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

युवतीच्या आत्महत्येप्रकरणी सर्वपक्षीयांचा पोलीस ठाण्यात घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 22:07 IST

सिन्नर : येथील संजीवनीनगर भागातील २५ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर सात दिवस उलटूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. ५) सिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस निरीक्षकांवर प्रश्नांची सरबत्ती केली. सदर युवतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीयांनी पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देनिवेदन : सिन्नरला उद्या मोर्चा; पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह

सिन्नर : येथील संजीवनीनगर भागातील २५ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर सात दिवस उलटूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. ५) सिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस निरीक्षकांवर प्रश्नांची सरबत्ती केली. सदर युवतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीयांनी पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.किरण राजेंद्र सानप (२५) या संजीवनीनगर भागात राहणाऱ्या युवतीने आठ दिवसांपूर्वी राहत्या घरात ओढणीने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला सात दिवस उलटल्यानंतरही युवतीच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तपासात ढिलाई दाखवल्याचा आरोप करत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बुधवारी सिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या घटनेचा जाब विचारला. भाजप नेते भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड, रमेश नागरे, वंजारी फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष कृष्णा दराडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद चोथवे, सोमनाथ वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम मुरकुटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह समाधान गायकवाड, मुजाहिद शेख, मोहसीन शेख मराठा व वंजारी महासंघाचे पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यात घेराव घातला. पोलीस निरीक्षक मुटकुळे यांना बाहेर बोलावून निवेदन देण्यात आले. संशयितास त्वरित अटक करावी व सखोल तपास करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली...अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हायुवतीने आत्महत्या करून आठ दिवस उलटल्यानंतर कारवाई होत नसल्याने बुधवारी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारल्यानंतर नातेवाइकांचे जबाब व फिर्याद घेऊन सायंकाळी संशयित रईस शेख याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.उद्या मोर्चासह रास्ता रोकोयाप्रकरणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढण्याची व बसस्थानकासमोर रास्ता रोको करण्याची घोषणा भाऊसाहेब शिंदे यांनी केली. युवतीच्या वडिलांचे लहानपणी निधन झाले, तर सांभाळ करणाऱ्या आजी-आजोबांचा कोरोना लाटेत मृत्यू झाला. त्यामुळे युवतीच्या एकाकीपणाचा फायदा उठवून आरोपीला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप अनेकांनी केला. 

टॅग्स :sinnar-acसिन्नरPoliceपोलिस