शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हाबाधिताच्या संपर्कातील सारे निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 22:43 IST

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या पंधरा जणांच्या तपासणीचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने यंत्रणेने सुस्कारा सोडला आहे. प्रलंबित नमुन्यांचा अहवाल बुधवारी मिळणार आहे. आरोग्य विभागाने गावातील सुमारे चौदाशे कुटुंबांची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली आहे.

ठळक मुद्देचौदाशे कुटुंबांची तपासणी : ‘त्या’ रुग्णाच्या प्रकृतीतही सुधारणा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या पंधरा जणांच्या तपासणीचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने यंत्रणेने सुस्कारा सोडला आहे. प्रलंबित नमुन्यांचा अहवाल बुधवारी मिळणार आहे. आरोग्य विभागाने गावातील सुमारे चौदाशे कुटुंबांची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली आहे.गेल्या दोन दिवसांत कोरोना संशयित रुग्णांची संख्या २४ वर पोहोचली असून, या सर्वांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. बाधित रुग्णाच्या प्रकृतीत सुधार होत असून, त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या तपासणीतही कोरोनासदृश लक्षणे दिसत नसल्याने आरोग्य विभागाला हायसे वाटले आहे.संपूर्ण गावच आगामी चौदा दिवसांसाठी क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. या दिवसांमध्ये दररोज प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी केली जाईल. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावांवरही आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. संपर्कात आलेल्या व्यक्ती साधारणत: पन्नास वयोगटाच्या आतील असल्यामुळे संशयित रुग्ण बरे होतील, असा विश्वासही व्यक्त होत आहे. निफाड तालुक्यात ५० जण होम क्वॉरण्टाइन बाधिताच्या संपर्कातील जवळपास ८० लोक संपर्कात आल्याच्या संशयावरून त्या व्यक्तींचाही आरोग्य व पोलीस विभागाच्या मदतीने शोध घेतला जात आहे. रुग्णाच्या गावातील चौदाशे कुटुंबांची गेल्या दोन दिवसांत आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी पूर्ण केली आहे.

निफाड तालुक्यात रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी करून सर्वांना होम क्वॉरण्टाइन करण्यात येणार असल्याच्या चर्चेचा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी इन्कार केला आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनाच निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. या रुग्णाच्या संपर्कातील ५० जणांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य