शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मर्यादेत घेतल्यास मधुमेहींना सर्व आहार योग्यच : आदिती देशमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 00:52 IST

मधुमेह झालेल्या रुग्णांच्या मनात आहाराविषयी खूपच भीती असते. मात्र मधुमेह झालेले रुग्ण इतर सर्वसामान्यांप्रमाणे सर्वकाही खाऊ शकतात, फक्त ते खाताना त्याचे प्रमाण ठरवायला हवे, असे मत कोल्हापूर येथील आहारतज्ज्ञ डॉ. आदिती देशमाने यांनी राज्यस्तरीय मधुमेह संमेलनात रविवारी (दि.१६) आयोजित चर्चासत्रात व्यक्त केले.

ठळक मुद्देराष्टÑीय मधुमेह संमेलनाचा समारोप

नाशिक : मधुमेह झालेल्या रुग्णांच्या मनात आहाराविषयी खूपच भीती असते. मात्र मधुमेह झालेले रुग्ण इतर सर्वसामान्यांप्रमाणे सर्वकाही खाऊ शकतात, फक्त ते खाताना त्याचे प्रमाण ठरवायला हवे, असे मत कोल्हापूर येथील आहारतज्ज्ञ डॉ. आदिती देशमाने यांनी राज्यस्तरीय मधुमेह संमेलनात रविवारी (दि.१६) आयोजित चर्चासत्रात व्यक्त केले.या चर्चासत्रात मधुमेह रुग्णांच्या आहाराविषयी चर्चा झाली. यावेळी डॉ. आदिती देशमाने म्हणाल्या, आहाराविषयी मधुमेहाचे रुग्ण वेगवेगळ्या शंका व्यक्त करतात. भात, भाकरी, दूध याविषयी त्यांच्या मनात वेगवेगळ्या शंका असतात. परंतु मधुमेहाचे रुग्णही सर्वकाही खाऊ शकतात. यासाठी आपली जीवनशैली, वजन, उंची यांचा विचार करून खायचे प्रमाण ठरवायला हवे.तूप हा सिंग्ध पदार्थ आहे त्यामुळे त्यात प्रोटीन्स असतात. यामुळे अमुक एक प्रकारचेच तूप घ्यावे असे नाही तर कुठलेही तूप योग्य प्रमाणात घेतले तर ते चालते, असे त्या म्हणाल्या. यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे त्यांनी समाधान केले. यानंतर संमेलनाचा समारोप झाला. समारोपप्रसंगी डॉ. नारायण देवगावकर, डॉ. वसंत कुमार, डॉ. समीर चंद्रात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. त्यानंतर संमेलनासाठी परिश्रम घेणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या संमेलनात राज्यभरातील डॉक्टरांनी हजेरी लावली. समारोप सत्रानंतर नागरिकांसाठी शरद उपाध्ये यांच्या राशीचक्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कोरोना विषाणूबाबत दिली माहितीमुंबई येथील डॉ. संदीप राय यांनी एका चर्चासत्रात कोरोना विषाणूबाबत माहिती दिली. कोरोना व्हायरस अद्याप भारतात पसरलेला नाही, मात्र तो पसरू नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. ज्याला कोरोना झाला आहे त्याच्या शिंकेवाटे, खोकल्यामुळे विषाणू बाहेर पडतात व ते आपल्या आजूबाजूला साचतात. अशा वस्तूंशी आपला संपर्क आला व तेच हात आपल्या नाका-तोंडाला लागल्यास आपल्याला या विषाणूची लागण होऊ शकते. यासाठी दिवसातून पाच-सहा वेळा हात स्वच्छ धुवा, आपल्या परिसरात स्वच्छता पाळा असा सल्ला त्यांनी दिला.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य