शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्या करणाऱ्या चौघांना अटक

By admin | Updated: December 26, 2016 01:57 IST

मालेगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाची कारवाई; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

 मालेगाव : शहर परिसरात मंदिर चोरीसह घरफोडी व विविध जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चौघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीचा माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.या प्रकरणी उबेद समसुद्दीन अन्सारी ऊर्फ बड्डे (१९, रा. काकूबाईचा बाग, संगमेश्वर), मोहंमद सुफीयान जमशेद अहमद (२३, रा. अन्वर शाबाननगर आयेशानगर कब्रस्तानजवळ), शेख मोहसीन शेख ऊर्फ भतीजा (२०, रा. अवलीया मशिदीमागे, एकबाल डाबीजवळ), आमीर शहा अरमान शहा ऊर्फ इमू (१८, रा. रमजानपुरा) यांना अटक करण्यात आली आहे. शहरात १८ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास वर्धमाननगरातील जैन मंदिरात अज्ञान चोरट्यांनी प्रवेश करून गाभाऱ्यातील दानपेटी तोडून त्यातील ३५ हजारांची रोकड चोरून नेल्याचा गुन्हा छावणी पोलिसांत दाखल झाला होता. शहर-परिसरात घरफोड्या वाढल्याने जिल्हा पोलीसप्रमुख अंकुश शिंदे व अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून बैठक घेतली. शनिवारी (दि. २४) पथकातील कर्मचारी संगमेश्वर परिसरात गस्त घालत असताना पोलीस निरीक्षक नवले यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी उबेद समसुद्दीन अन्सारी यास ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याचा साथीदार मोहंमद सुफीयान जमशेद अहमद याच्यासह वर्धमाननगरातील जैन मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम चोरून नेल्याची कबुली त्याने दिली. आरोपी मोहंमद सुफीयान यास नवीन बसस्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडे चौकशी केली असता जाफरनगर भागातील मुर्गीवाले यांच्या दुकानातून ९ हजारांची रोकड, आयेशानगर कब्रस्तान परिसरातील दूध डेअरी, रमजानपुरा भागातील डॉ. सईद रजा दवाखान्यात चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. आरोपींच्या ताब्यातून ९ हजार ७०० रुपये व सहा हजार रुपये किमतीची चांदीची नाणी असा एकूण १५ हजार ७०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. शेख मोहसीन शेख ऊर्फ भतीजा (२०, रा. अवलीया मशिदीमागे, एकबाल डाबीजवळ) याच्यासह वरील दोघांनी सटाणा नाका परिसरात गणेश मोबाइल शॉपमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. मंगळवारी (दि. २०) सटाणा नाका परिसरातील गणेश मोबाइल शॉपचे शटर तोडून दुकानातील १४ स्मार्ट भ्रमणध्वनी संच असा एकूण ९१ हजार ८३५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरील तिन्ही सराईत चोरटे असून, त्यांनी मोसम पूल परिसरात मोटारसायकलवर ट्रिपल सीट येऊन एका इसमाचा भ्रमणध्वनी संच चोरल्याची कबुली दिली. तिघांकडे चौकशी केली असता मोसम पूल, स्टेट बॅँक, म्युनिसिपल हायस्कूल, साठफुटीरोड, पवारवाडी, रौनकाबाद, इंडियन बुटीक परिसरात दुचाकीवर येऊन भ्रमणध्वनी संच चोरल्याची कबुली चोरट्यांनी दिली. याप्रकरणी त्यांचा साथीदार आमीर शहा अरमान शहा ऊर्फ इमू (१८, रा. रमजानपुरा) यास शिवाजी पुतळा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून १९ भ्रमणध्वनी संच, एक होण्डा शाइन, एक प्लसर दुचाकी असा एकूण एक लाख ७७ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला. सदर आरोपींना कॅम्प व छावणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)