लोहोणेर : देवळा तालुक्यातील सावकी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलकाबाई गायकवाड, तर उपसरपंचपदी ज्येष्ठ सदस्य कारभारी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सावकी येथील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांची सरपंच व उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सभागृहात बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी अहिरराव हे होते. या बैठकीस अरुण पाटील, रामदास गोदडे, उषाबाई सोनवणे, मनीषा सोनवणे, सुवर्णा पाटील, भिका वाघ, संजय गांगुर्डे आदि सदस्यांसह तलाठी एस. पी. विधाते, ग्रामसेवक वैशाली पवार, पोलीसपाटील, अश्विनी बच्छाव, धर्मा शिवले, प्रकाश पाटील, रमेश अहिरे , दिलीप पाटील, मनोज जगताप, पुंडलिक शिवले, शरद बच्छाव, सुनीता बच्छाव, हिरामण अहिरे, जिभाऊ निकम, सुंदर तिवारी, गणेश तिवारी, भिकन भामरे, जगन पवार, भाऊसाहेब पवार, राजाराम सोनवणे, शंकर सोनवणे, रावसाहेब गायकवाड, अनिल भामरे, नीलेश पाटील, दिनकर निकम, भास्कर निकम, केवळ भामरे, प्रभाकर शिवले, संतोष शिवले, मदन निकम, उत्तम भामरे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
सावकीच्या सरपंचपदी अलका गायकवाड
By admin | Updated: July 15, 2016 23:32 IST