शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 18:35 IST

गेल्या चार दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे दारणा धरणाच्या पाण्याची पातळी ८७ टक्क्यापेक्षा अधिक वाढली आहे. त्यातच नाशिक तालुक्यात दारणाकाठच्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने नदी, नाले तुडुंब भरून वाहत

ठळक मुद्देधोक्याची पातळी : शेणीत पूल वाहतुकीसाठी खुलास्मशानभूमींना पाण्याने वेढा दिला आहे. तर नदीकाठची मंदिरे पाण्यात बुडाली

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : पावसाची संततधार सुरू असल्याने दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्याने धरणातून दुसऱ्या दिवशीही १३ हजारांहून अधिक क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भगूर-इगतपुरी दरम्यानच्या शेणीत येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने सोमवारी सायंकाळी बंद करण्यात आलेली वाहतूक मंगळवारी पूर्ववत सुरू करण्यात आली.

गेल्या चार दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे दारणा धरणाच्या पाण्याची पातळी ८७ टक्क्यापेक्षा अधिक वाढली आहे. त्यातच नाशिक तालुक्यात दारणाकाठच्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. धरणाचा धोका टाळण्यासाठी सोमवारी दुपारपासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दारणा नदीला पूर आला असून, सोमवारी सायंकाळनंतर भगूर-इगतपुरी मार्गावरील शेणीत जवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने पोलीस पाटील यांनी पोलीस प्रशासनाला माहिती दिल्यानंतर तातडीने पुलावर बंदोबस्त तैनात करण्यात आला. या मार्गावरील वाहतूक बंद झाल्यामुळे भगूरहुन इगतपुरीकडे जाणा-या सुमारे पंचवीस खेड्यांची वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पांढुर्ली मार्गे राष्ट्रीय महामार्गाचा वापर करत घोटी मार्गाने जावे लागले.गेल्या चार वर्षांनंतर या पुलावरून पाणी गेल्याने आजूबाजूच्या शेतांमध्येही पाणी घुसले व चालू पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय दारणाकाठच्या साकूर, लोहशिंगवे, वंजारवाडी, भगूर, राहुरी, दोनवाडे, बेलतगव्हाण, नानेगाव या गावांच्या स्मशानभूमींना पाण्याने वेढा दिला आहे. तर नदीकाठची मंदिरे पाण्यात बुडाली आहेत. मंगळवारी दुपारनंतर पावसाने काहीकाळ विश्रांती घेतल्याने सकाळपासूनच शेणीत पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र दारणा नदीचा पूर कायम आहे.

 

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक