नवीन संशोधनामुळे लसीकरणात मद्यपींचाही पुढाकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:13 AM2021-04-10T04:13:46+5:302021-04-10T04:13:46+5:30

नाशिक : प्रारंभीच्या टप्प्यात लसीकरणाबाबतचे असलेले अनेक गैरसमज आता तीन महिन्यांच्या कालावधीनंतर कमी होऊ लागले आहेत. विशेषत्वे दररोज मद्यपान ...

Alcohol also leads in vaccination due to new research! | नवीन संशोधनामुळे लसीकरणात मद्यपींचाही पुढाकार !

नवीन संशोधनामुळे लसीकरणात मद्यपींचाही पुढाकार !

Next

नाशिक : प्रारंभीच्या टप्प्यात लसीकरणाबाबतचे असलेले अनेक गैरसमज आता तीन महिन्यांच्या कालावधीनंतर कमी होऊ लागले आहेत. विशेषत्वे दररोज मद्यपान करणाऱ्या व्यक्ती लसीकरणानंतर मद्यपान करता येणार नसल्याची अट ऐकून लसीकरण टाळत होते. मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार लसीकरणानंतर मद्यपानाने प्रकृतीला किंवा लसीच्या परिणामकारकतेत घट येत नाही असा निष्कर्ष पुढे आला आहे. त्यामुळे आता नियमित मद्यपान करणाऱ्या व्यक्तीदेखील लसीकरणासाठी पुढे येऊ लागल्या आहेत.

देशात कोरोना लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात कोरोना लस घेतली असेल किंवा घेणार असल्यास त्याबाबत मद्यप्रेमींना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला होता. विशेषत्वे ज्या व्यक्तींना दारू पिण्याची सवय असेल त्यांना अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. दारुमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. परिणामी लसीमुळे कोरोना व्हायरसबरोबर लढण्यासाठी आवश्यक असलेली रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. त्यामुळे कोरोना बळावतो. यामुळेच कोरोना लस घेण्याआधी आणि घेतल्यानंतरही किमान दोन महिने दारुचे सेवन करू नये, असे तज्ज्ञांनी म्हटले होते.

इन्फो

प्रारंभीच्या मतप्रवाहात बदल

फक्त दारुचं नाही तर लस घेतल्यानंतर साखरयुक्त पेय, हवाबंद डब्यातील पदार्थ, जंक फूड खाणेही टाळावे. मात्र, भारतात अधिकृतपणे लस घेतल्यानंतर दारू पिण्यासंबंधी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. काही आरोग्य तज्ञांचं म्हणणं आहे की लसपूर्वी आणि एक दिवस नंतर मद्यपान करू नये, असेही मतप्रवाह प्रारंभीच्या टप्प्यात होते. मात्र, सुधारित संशोधनानुसार संतुलित प्रमाणात मद्याचं सेवन केलं तर लसीच्या परिणामाबद्दल चिंता करण्याची गरज नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

इन्फो

आरोग्यदायी जीवनशैली उपयुक्त

कोविड लसीकरणासाठी रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम असण्‍यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घेणे देखील आवश्यक आहे. एका संशोधनानुसार दररोज पाच तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांमध्‍ये पुरेशी झोप घेणाऱ्यांच्‍या तुलनेत लसीकरणाचा अर्धा प्रभाव दिसून आला. हेच समीकरण कोविड लसीकरणाबाबतही लागू पडू शकते. त्यामुळेच कोविड लसीकरणानंतरही नागरिकांनी सक्रिय राहणे, व्‍यायाम करणे तसेच पुरेशी झोप घेणे हाच लसीकरणाचे चांगले परिणाम कायम ठेवण्याचा मार्ग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शारीरिकदृष्‍ट्या तंदुरुस्‍त आणि आरोग्‍यदायी जीवनशैली राखल्‍यामुळे कोणत्‍याही प्रकारच्‍या गंभीर आजारांचा धोका कमी होण्‍यामध्‍ये मदत होते, हे तत्व इथेही लागू पडते.

इन्फो

संतुलित असल्यास नको चिंता

अत्यंत संतुलित प्रमाणात मद्य घेतल्यास कोणतीही हानी होत नाही. रोगप्रतिकारक यंत्रणेवरही त्याचा काहीही परिणाम होत नाही, असेही तज्ज्ञांचे मत आहे. तर दुसरीकडे, काही आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लस घेण्यापूर्वी किमान एक दिवस आणि त्यानंतर एक दिवस मद्यपान करू नये. त्याशिवाय काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर संतुलित प्रमाणात अल्कोहोलचे सेवन करत असाल, तर कोरोना लस घेण्यापूर्वी तसेच त्यानंतर चिंता करण्याची गरज नाही. मात्र, दोन पेगपेक्षा अधिक मद्यपान करत असाल, तर हे प्रमाण कमी करावे लागेल असाही इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

Web Title: Alcohol also leads in vaccination due to new research!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.