शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण

By admin | Updated: July 5, 2014 00:20 IST

सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण

नाशिक : मुख्यमंत्रिपद तुम्हाला की अजितदादांना, या प्रश्नावर, ‘मला भाऊ महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्रिपदावरून आमच्या घरात भांडण लावण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र मला मुख्यमंत्रिपदापेक्षा माझा भाऊ व रक्ताचे नाते खूप महत्त्वाचे आहे. आमच्यात या मुद्द्यावर अजिबात भांंडण होणार नाही,’ असा पुनरुच्चार राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या संस्थापक, खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.राष्ट्रवादीच्यावतीनेनाशिक विभागीय सोशल मीडिया कार्यशाळेसाठी त्या आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या. ठाण्यातील मंदा म्हात्रे यांच्यासह काही महिला पदाधिकाऱ्यांनी संधी न मिळाल्याने पक्ष नेतृत्वावर टीका केल्याबद्दल त्यांनी सांगितले की, ज्यांनी महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला त्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका करणे चुकीचे आहे. ज्यांना पक्ष सोडून जायचे त्यांनी स्वखुशीने जावे, त्यांना माझ्या वैयक्तिक शुभेच्छा आहेत. मात्र महिलांबाबत सर्वाधिक कार्य राष्ट्रवादीनेच केले आहे. आज महाराष्ट्रात स्त्रीभ्रूण हत्त्या व कुपोषण कमी झाले ते केवळ राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या प्रयत्नांमुळेच. त्यामुळे पक्ष महिलांना डावलतो, हा आरोप चुकीचा आहे. अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने निवडणुकीला पक्ष कसा सामोरे जाणार, यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करणे सोपे असते; मात्र ते सिद्ध होणे महत्त्वाचे असते. लोकशाहीत काही काळानंतर पराभव होतोच. लोकसभेच्या पराभवामुळे पक्षाला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. पक्ष व संघटनेचे नेमके कुठे चुकले, आम्ही कुठे कमी पडलो याचे चिंतन करण्याची गरज असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले. त्यादृष्टीने निर्धार मेळाव्यांना पक्षाचे ज्येष्ठ मंत्री व नेते विभागनिहाय बैठका घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवतीच्या पदाधिकाऱ्यांना विधानसभेत उमेदवारीची संधी दिली तर निश्चितपणे युवती निवडणूक लढवतील; मात्र तिकीट देण्याचा निर्णय सर्वस्वी प्रदेशाध्यक्षांचा आहे. रेल्वेची भाडेवाढ ही एकदम करण्यापेक्षा टप्प्याटप्प्यांत करणे गरजेचे होते, तीही संसदेत चर्चा करून भाडेवाढ करायला हवी होती, अशी टीका त्यांनी यावेळी केंद्र सरकारवर केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)