शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

रेल्वेस्थानकात हवा शुद्धीकरण यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:04 IST

नाशिकरोड रेल्वेस्थानकात हवा शुध्द करणारे एअर प्युरिफायर यंत्र लावण्यात आले असून, उर्वरित दोन यंत्रे लवकरच लावण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी : आणखी दोन मशीन येणार

नाशिकरोड : नाशिकरोडरेल्वेस्थानकात हवा शुध्द करणारे एअर प्युरिफायर यंत्र लावण्यात आले असून, उर्वरित दोन यंत्रे लवकरच लावण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.रेल्वे भुसावळ विभागाचे अधिकारी, एअर प्युरिफायर यंत्र तयार करणाऱ्या पुण्याच्या स्ट्राटा एनव्हायरो कंपनीचे अमोल चाफेकर, रेल्वे स्थानक प्रबंधक आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य अधिकारी कुंदन महापात्रा, रेल्वे अभियंता एस. जी. सय्यद, विजय तिवडे, इलेक्ट्रीक विभागाचे अजय कुमार आदींनी पाहणी केली होती. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. स्थानकात प्रवेशद्वाराजवळ वाहनांमुळे हवा प्रदूषित होते. तेथे सहा एअर प्युरिफायर यंत्रे लावण्याबरोबर इतर ठिकाणी गरजेनुसार चार ते सात यंत्रे लावण्याचे ठरविण्यात आले होते.प्रगत देशांत या कंपनीने अशी यंत्रे बसवली असून बंगळुरू, ठाणे, दिल्ली, मुंबई, कोलकाता येथेदेखील लावण्यात आली आहेत. ट्रॅफिक सिग्नल, बस-रेल्वेस्थानक, विमानतळ, टोल नाका, मॉल्स, हॉस्पिटल्स, शाळा, सोसायट्या, पेट्रोलपंप आदी गर्दीच्या ठिकाणी एअर प्युरिफायर लावणे फायद्याचे ठरले आहे. रेल्वेस्टेशनमध्ये सहा ठिकाणी सामाजिक संघटनांच्या मदतीने ती यंत्रे लावली जाणार आहेत. एक ते पाच लाखापर्यंत किंमत असलेले एअर प्युरिफायर मिनिटाला किमान २००० क्यूबिक फूट हवा, धूळ एक मशीन खेचून घेते. नंतर ही धूळ, माती नर्सरींना वापरण्यासाठी देण्यात येते. नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या दर्शनी बाजूच्या रिक्षा रॅकच्या दुभाजकावर पहिले एअर प्युरिफायर मशीन बसविण्यात आले आहे.धूळ खेचणार; प्रवाशांना मिळणार दिलासाएक ते पाच लाखापर्यंत किंमत असलेले एअर प्युरिफायर मिनिटाला किमान २००० क्यूबिक फूट हवा, धूळ एक मशीन खेचून घेते. नंतर ही धूळ, माती नर्सरींना वापरण्यासाठी देण्यात येते. नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या दर्शनी बाजूच्या रिक्षा रॅकच्या दुभाजकावर पहिले एअर प्युरिफायर मशीन बसविण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे