शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

देशाच्या सीमा रक्षणासाठी वायुसेना सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 1:42 AM

बदलत्या आंतराराष्ट्रीय घडामोडींचे परिणाम देशाच्या सीमा भागातही उमटतात. त्यामुळे देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी सैन्याला सदैव तत्पर राहवे लागते.

नाशिक : बदलत्या आंतराराष्ट्रीय घडामोडींचे परिणाम देशाच्या सीमा भागातही उमटतात. त्यामुळे देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी सैन्याला सदैव तत्पर राहवे लागते. अशाप्रकारची कोणतीही स्थिती भारत-पाक अथवा भारत चीन सीमेवर उद्भवली, तर भारतीय वायुसेना दोन्ही आघाड्या सांभाळण्यास सक्षम आहे. वायुसेनेची ही ताकद कायम अद्यावत ठेवण्यासाठी २९ एप्रिल १९७४ पासून अविरत कार्यरत असलेल्या ११ बेस रिपेअर डेपोत ५० टक्के मीग २९ विमानांचे अद्यावतीकरण पूर्ण झाले आहे, तर सुखोई ३० एमकेआय विमानाचे संपूर्ण ओव्हर्लिंग करून २४ एप्रिल २०१८ रोजी यशस्वी उड्डाणही करण्यात आल्याने वायुसेनेला आणखी बळ मिळाले असून, कोणत्याही संकटाचा सामना करण्यास वायुसेना सक्षम असल्याचे ११ बीआरडीचे आॅफिसर एअर कमोडोर समीर बोराडे यांनी सांगितले.भारतीय वायुसेनेच्या ८६व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (दि.२८ ) वायुसेनच्या ओझर येथील ११ बेस रिपेअर डेपोमध्ये प्रसारमाध्यमांना भारतीय वायुसेना व त्यांच्या कार्यपद्धतीची प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली. यावेळी ११ बेस रिपेअर डेपोमध्ये सध्या सुरू असलेल्या मीग २९ व सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानांची दुरुस्ती व देखभाल प्रक्रियेविषयी माहिती देतानाच लढाऊ विमानांच्या कार्यक्षमतेत व आयुर्मान वाढविण्यासाठी सुरू असलेल्या अपग्रेडेशन (अद्यावतीकरण) प्रक्रियेची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ओझर येथे २९ एप्रिल १९७३ बीआरडीची सुरुवात मीग २९ व सुखोई एमकेआय डेपो या नावाने झाल्यानंतर १ जानेवारी १९७५ला ११बेस रिपेअर डेपो असे नामकरण झालेल्या या देखभाल दुरुस्ती केंद्रात १०८८ पर्यंत एसयू सात विमानांची देखभाल दुरुस्ती करण्यात आली. १९८३ ते ८८ पर्यंत मीग २१ व २८ विमानांची देखभाल दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर मीग २३ विमानांची देखभाल दुरुस्तीचीही व्यवस्था करण्यात आली. मे १९८८ मध्ये मीग २३ दुरुस्तीचे काम सुरू झालेय २४८ मीग २३ विमानांची संपूर्ण देखभाल दुरुस्ती केल्यानंतर मे २०१५ मध्ये सक्वॉर्डनमध्ये पाठविण्यात आले. मीग २९ विमानचे काम १९९६ मध्ये ११बीआरडीला मिळाल्यानंतर आतापर्यंत ५०टक्के विमानांचे अद्यावतीकरणही करण्यात आल्याने विमानांची क्षमता पूर्वीपासून दुपटीने वाढली असून, आयुर्मानही ४० वर्षांनी वाढले आहे. दरम्यान, लवकरच येथे मोठा कार्यक्रम होणार असल्याचे सांगताना ११ बीआरडीला आणखी वेगळे आणि आव्हानात्मक काम मिळण्याचे संकेतही समीर बोराडे यांनी दिले.स्वावलंबनाकडे वाटचाल११ बीआरडी येथे लढाऊ विमानांचे अंडर कॅरेज, गियर व्हील, सुखोई ३०च्या इजेक्शन सीट निर्मिती यशस्वीरीत्या केली असून, हे पाट केवळ ओझर येथेच तयार केले जातात. अशाप्रकारे विमानाचे पार्ट तयार करून वायुसेना स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे एअर कमोडोर समीर बोराडे यांनी सांगितले.कौशल्य विकासाला चालनाओझर येथील ११ बीआरडीमध्ये लढाऊ विमानांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कौशल्य निपून मनुष्यबळाची आवश्यकता अहे. त्यासाठी बीआरडीमार्फत अभियांत्रिकीच्या विद्यार्थिंना विशेष कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणही देण्यात येत असून, विविध शालेय भेटींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासासाठी प्रयत्न केले जातात.११ बीआरडीमध्ये सध्या मीग २९ आणि सुखोई ३० एमकेआय विमानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणाऱ्या ९० टक्के सुट्या भागांची निर्मिती देशातच होते. त्यामुळे विमानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी भारत स्वयंपूर्ण होत असून, स्थानिक उद्योगांनाही काम मिळत आहे. ११ बीआरडीमुळे नाशिकमधील जवळपास ५० लहान-मोठ्या उद्योगांना विमानाचे लहान-मोठे वेगवेगळे सुट्टे भाग बनविण्याचे काम मिळत असल्याने स्थानिक उद्योग विकासालाही यामुळे चालना मिळण्यात मदत होते.-समीर बोराडे, कमांडिंग आॅफिसर, ११ बीआरडी, ओझर

टॅग्स :airforceहवाईदलindian air forceभारतीय हवाई दल