शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'नवरात्रौत्सवात दंगली झाल्यास शासन जबाबदार'; प्रवीण तोगडियांचा इशारा, इतर धर्मियांना गरब्यात येण्याला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 17:04 IST

नवरात्रौत्सवात हिंदूंनाच मंदिरात व गरब्यात प्रवेश द्यावा अशी भूमिका प्रवीण तोगडिया यांनी मांडली आहे.

Pravin Togadia on Garba : नवरात्रोत्सवातील गरब्यावरुन नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. नवरात्रौत्सवात गरबा खेळण्यासाठी केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा, अशी स्पष्ट भूमिका विश्व हिंदू परिषदेने मांडली आहे. त्यानंतर आता नवरात्रौत्सवात हिंदूंनाच मंदिरात व गरब्यात प्रवेश द्यावा, इतर धर्मियांना प्रवेश नको, असं मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी मांडली आहे. 'आम्ही इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळी जात नाही, मग ते आमच्या धार्मिक कार्यक्रमात का यावेत? यामुळे कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्ह प्रकार घडल्यास दंगली भडकू शकतात आणि त्याची जबाबदारी शासन-प्रशासनावर राहील,' असा इशाराही प्रवीण तोगडिया यांनी दिला.

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी हिंदू हुंकार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना प्रवीण तोगडिया यांनी आपली भूमिका मांडली. नवरात्रौत्सवात 'वीर हिंदू-विजेता हिंदू' अभियान देशभर राबवले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलातर्फे या अभियानाअंतर्गत विजयादशमीच्या दिवशी प्रत्येक मंदिरात शस्त्रपूजन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 'ज्या ठिकाणी देवीसमोर गरबा साजरा केला जातो, तिथे शस्त्रपूजन करण्यात यावे,' असेही प्रवीण तोगडिया यांनी  स्पष्ट केले.

तसेच अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्या करण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी. यासोबतच दर शनिवारी प्रत्येक मंदिरात हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच आगामी सिंहस्थात आम्ही आमचे योगदान देणार असून साधु महंतांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा देण्यासाठी त्वरित प्रयत्न करावा, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या म्हणजे संभाव्य आत्महत्या टळतील, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

शनिवारी हनुमान चालिसा, घरोघरी त्रिशूल वाटप...

हिंदूंचे संघटन होण्यासाठी दर शनिवारी हनुमान मंदिरांमध्ये एकत्र येत हनुमान चालीसाचे पठण करा, त्यासाठी कॉलनीतील हिंदूंना एकत्र करा, असे आवाहनही त्यांनी केले. यासोबत नवरात्रीमध्ये शस्त्रपूजनासाठी परिषदेच्या वतीने त्रिशूल वाटणार असल्याचे डॉ. तोगडिया यांनी जाहीर केले. हिंदूंची लोकसंख्या कमी होणे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे प्रत्येक घरात किमान तीन मुलांना जन्म घालणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Navratri Mahotsav 2025शारदीय नवरात्रोत्सव २०२५garbaगरबाpraveen togadiaप्रवीण तोगडिया